AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : महिन्याच्या एक तारखेला करा हा वास्तू उपाय, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण

महिन्याच्या पहिल्या तारखेला वास्तूशास्त्रातले काही प्रभावी उपाय (Vastu Tips) केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

Vastu Tips : महिन्याच्या एक तारखेला करा हा वास्तू उपाय, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 29, 2023 | 7:41 PM
Share

मुंबई : आपल्या जीवनात मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत करतो. मात्र कधी त्यांना मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही तर कधी मिळालेला पैसा टिकत नाही.  त्यामुळे घरात नेहमी आर्थिक तणाव असतो. घरातील सुख-शांतीही भंग पावते. अशा परिस्थितीत महिन्याच्या पहिल्या तारखेला वास्तूशास्त्रातले काही प्रभावी उपाय (Vastu Tips) केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

वास्तु टिप्स

  1. घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी. वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो. जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा. वास्तूनुसार, पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही. व्यापार वृद्धी यंत्र, महालक्ष्मी यंत्र आणि बिसा यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा. तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते.
  2. खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची महिन्याच्या पहिल्या तारखेला मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा. या दोघांची नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  3. रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात अशी खरकटी भांडी टाकतात. वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे लक्ष्मी देवी कधीच वास करत नाही. म्हणूनच रात्री भांडी धुवा किंवा घरा बाहेर ठेवा.
  4. ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये, ही दिशा मंदिराची जागा मानली जाते. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते.
  5. जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजाघरात अवश्य ठेवा. रोज पूजा करताना हा शंख वाजवा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?