Vastu Tips In Marathi : जीवनात करायची असेल प्रगती तर, कपड्याच्या संबंधीत हे वास्तू नियम अवश्य पाळा
Vastu Tips Marathi वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आपेत. या नियमांचा संबंध हा आर्थिक परिस्थितीशी आहे. कपडे आणि पेहरावाशी संबंधीत हे नियम आहेत ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर थेट पडत असतो. यामुळे हे नियम अनेक यशस्वी लोकंसुद्धा पाळतांना दिसतात. तुम्हालासुद्धा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हे नियम तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात.
मुंबई : आपल्या सगळ्यांना आपल्या आवडीचे कपडे घालायला आवडतात. अनेकांसाठी कपडे हा जीव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्त्येक कार्यप्रसंगी वेगवेगळे कपडे परिधान करण्याची अनेकांना आवड असते. चांगल्या चांगल्या आणि योग्य पेहरावामुळे आपल्या व्यक्तीमत्वात भर पडते. म्हणूनच प्रत्येकजण आपले कपडे परिधान करण्याच्या शैलीकडे विशेष लक्ष देत. कपड्यांच्या संबंधीतही वास्तूशास्त्रात (Vastu Upay) काही नियम सांगण्यात आले आहे. ज्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन जीवनात प्रगतीचे दारं खुले होतात.
रात्री रेशमी कपडे घालू नये
रात्री झोपताना रेशमी कपडे घालू नयेत. रात्री सुती कपडे घालणे चांगले. यामध्ये तुम्हाला चांगली झोप येईल. सुती कपडे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवतील. रात्री रेशमी कपडे परिधान केल्याने शरीराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो.
फाटलेले कपडे घालू नये
कपड्यांचा एक नवीन ट्रेंड, रिप्ड जीन्स, ट्रेंडमध्ये आहे. फॅशनेबल दिसण्यासाठी अनेकांना ते परिधान करायला आवडते. वास्तुशास्त्रानुसार फाटलेले कपडे घालू नयेत. त्यामुळे दारिद्य वाढते.
घाणेरडे कपडे घालणे टाळा
कधीही घाणेरडे कपडे घालू नयेत. घाणेरडे कपडे आयुष्यात नकारात्मकता आणतात. यामुळे मन अशुद्ध राहते. तणावही वाढू लागतो.
तुमचे आवडते कपडे घाला
कपडे घालताना तुमच्या आवडीनिवडी विचारात घ्या. बर्याच वेळा आपल्याला एका प्रकारचे कपडे घालायचे असतात, परंतु इतरांच्या म्हणण्याने प्रभावित होऊन इतर कपडे घालतात. वास्तुशास्त्रानुसार शरीर आणि मनानुसार कपडे परिधान केले पाहिजेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)