उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीयाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो.  Income certificate Aaple Sarkar

Yuvraj Jadhav

|

Mar 23, 2021 | 5:03 PM

मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास उत्पन्नाची अट निश्चित करण्यात येते. सरकारकडून विविध योजनांचा लाभ नागरिकांसांठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येते. शिक्षण घेताना देखील विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीयाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो.  हा दाखला जवळच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरुन काढता येतो.  (How to get income certificate from Aaple Sarkar)

उत्पन्नाचा दाखला कुठे मिळतो?

उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकत प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो असणारे सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं, अर्जदाराचा फोटो

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

वैद्यकीय मदत मिळवायची असल्यास

वैद्यकीय मदत मिळवाची असेल किंवा वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र

स्वंयघोषणापत्र

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

उत्पन्न दाखवणारी कागदपत्रं

प्राप्तिकर परतावा भरल्याचं प्रमाणपत्र, मंडल अधिकाऱ्याचा तपासणी अहवाल, नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16, निवृत्त पेन्शनधारकांसाठी बँक प्रमाणपत्र, अर्जदार शेतकरी असल्यास 7/12 आणि 8 अ चा उतारा

आपले सरकारवरुन अर्ज कसा करायचा?

आपले सरकारवर नवीन वापरकर्ता नोंदणी या लिंकवरुन नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करुन घ्या. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग पाहायला मिळतील त्यातून तुम्ही महसूल विभाग निवडा. त्यातून पुढे महसूल सेवा निवडा. तिथून पुढे उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. पुढे ओपन होणाऱ्या विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या, त्याप्रमाणं ती तयार ठेवा कारण ती वेबसाईटवर अपलोड करावे लागते.

वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, किती वर्षांपासून त्या पत्त्यावर राहतो ती माहिती सादर करावी.अपलोड करायची असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबीच्या दरम्यान असावीत.सर्व कागदपत्रे अपलोड करा. फोटो आणि सही देखील अपलोड करावेत. यानंतर अर्ज सादर करावा आणि अर्जाचं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा. जी पावती मिळेल ती सेव्ह करुन ठेवावी.

15 दिवसानंतर लॉगीन करुन प्रमाणपत्र मिळाले का पाहा?

आपले सरकारवरुन अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत आपल्याला मिळकतीचे प्रमाणपत्र मिळेल. काही अडचणीमुळे प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास 15 दिवसानंतर आपले सरकारच्या वेबसाईटवर लॉगीन करुन अपील अर्ज सादर करु शकता.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक, गावपुढाऱ्यांची कसोटी!

(How to get Income certificate from Aaple Sarkar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें