गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताय? या ‘5’ स्मार्ट ट्रिक नक्की वापरा!

गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायची आहे, सर्वात आधी घर स्वच्छ करायंचे आहे मात्र कसे करायचे समजत नाही? चला या लेखातून समजून घेऊया...

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताय? या 5 स्मार्ट ट्रिक नक्की वापरा!
Ganesh Festival
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 12:43 AM

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पाचे घरात स्वागत करताना प्रत्येक जण आपल्या परीने सर्वोत्तम तयारी करत असतो. यात सर्वात महत्त्वाचं टास्क म्हणजे घराची साफसफाई! पण ऑफिस, घरकाम आणि सणाची तयारी यामध्ये वेळ कमी आणि थकवा जास्त असतो. म्हणूनच घर झटपट कसे स्वच्छ करायचे, हे जाणून घेऊया या 5 स्मार्ट टिप्समधून.

1. स्मार्ट प्लॅनिंग करा:
साफसफाई करताना एकाच वेळी सगळे न करता, खोल्यांनुसार दिवस ठरवा. वरून खाली हा क्रम ठेवा म्हणजे वरची धूळ खाली पडल्यावर ती शेवटी सहज निघून जाईल. खोलीतील वस्तू, आकार आणि गरज यानुसार प्राधान्यक्रम ठरवा. काम अर्धवट राहणार नाही याची खात्रीही यामुळे होते.

2. नको असलेल्या वस्तू बाहेर काढा:
गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठी घरात मोकळी जागा लागते. यामुळे जुने, तुटलेले किंवा अनावश्यक सामान वेगळे ठेवा किंवा डोनेट करा किंवा फेकून द्या. आवश्यक वस्तू नीट पॅक करून योग्य ठिकाणी ठेवा.

3. स्वयंपाकघर व बेसिक फर्निचरवर लक्ष द्या:
किचनमधील बॉटल्स, डबे, किचन टॉप्स ओल्या आणि कोरड्या फडक्याने पुसा. सोफ्याचे कव्हर्स काढून धुवा, शक्य असल्यास व्हॅक्युम वापरा. पडदे आणि बेडशीट्स आधीच बदला, जेणेकरून शेवटच्या दिवशी गडबड होणार नाही.

4. पाहुण्यांची बसायची व्यवस्था नीट करा:
गौरी-गणपतीनिमित्त पाहुण्यांची रेलचेल असते. त्यामुळे घरातील फर्निचर व्यवस्थित मांडा, आवश्यक तेवढ्या चटया, खुर्च्या आधीपासूनच मोकळ्या करुन ठेवा. यामुळे पाहुण्यांचे स्वागत सुसज्ज आणि नीटनेटकेपणाने करता येईल.

5. मदतीसाठी नाही म्हणू नका:
कोणी मदत करत असेल तर ‘नाही’ आजिबात म्हणू नका. सर्व कामे स्वतःवर घेणे टाळा. घरातल्या सदस्यांची मदत घ्या. शक्य असेल तर मदतनीसांचीही मदत घ्या. काम वाटून केल्यास वेळही वाचतो आणि आपणही थकत नाही.

शेवटी एक बोनस टीप:
पूजेसाठी लागणाऱ्या मूर्ती, फुले, फुगे, दिवे, सजावटीचे समान एक दिवस आधीच तयार ठेवा. मंदिर गंगाजलाने स्वच्छ करा आणि फुलांनी सजवा. यामुळे चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला फक्त आनंद अनुभवायचा राहतो, बाकी कामांचा ताण नाही.

हे सर्व लक्षात ठेवलेत, तर बाप्पाचे स्वागत देखील झकास होईल आणि तुमचे घरही चकाचक दिसेल!