Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

| Updated on: May 27, 2021 | 3:44 PM

सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुण पुराण (Garuda Purana) असल्याचं मानलं जाते. या महापुराणात सृष्टीच्या आरंभापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात
जीवनात धर्माचे पालन करणे फार महत्वाचे आहे. धर्म आपल्याला नियमांमध्ये बांधतो, योग्य जीवन जगण्याची कला शिकवतो. जर तुम्ही धर्माच्या मार्गावर चालला नाही तर पैसा, संपत्ती, नातेसंबंध इत्यादी काहीही तुमच्यासोबत जास्त काळ राहू शकत नाही.
Follow us on

मुंबई : सनातन धर्मातील 18 महापुराणांपैकी एक गरुण पुराण (Garuda Purana) असल्याचं मानलं जाते. या महापुराणात सृष्टीच्या आरंभापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार आणि निष्काम कर्माचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले. गरुड पुराणात गरुड आणि नारायणाच्या गोष्टींमधून भक्तीचा धडा शिकविला गेला आहे (According To Garuda Purana These Three Habits Are Responsible For Quarrels And Tribulations In The Family).

या व्यतिरिक्त, लोकांना जीवनाशी संबंधित अशा सर्व गोष्टींबद्दल सांगितले गेले आहे, ज्याचे पालन केल्याने मनुष्य सर्व समस्या टाळू शकतो. गरुड पुराणात अशा तीन सवयी सांगितल्या गेल्या आहेत, जर त्या सुधारल्या नाहीत तर घरी पती-पत्नीमध्ये भांडण होऊ शकते.

घरात वापरात नसलेल्या गोष्टी गोळा करणे

काही लोकांना सवय असते की ते काहीही गोळा करतात, घरात कितीही रद्दी सामान जमा झालेले असेल तरी ते फेकून देत नाहीत. यामुळे कचरा घरात गोळा होत राहतो. पण घरात ठेवलेलं हे सामान नेहमीच अडचणी निर्माण करतात. हे घरात नकारात्मकता आणतात आणि परस्पर संबंध खराब करतात. आपल्या घरामध्ये जंग लागलेलं लोखंड, तुटलेलं फर्निचर, कुलूप नसलेल्या चाव्या असल्यास त्या काढून टाका.

प्रदूषित वातावरण

घरातील स्वच्छता आणि राहणीमानाने नियम हे प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी बनविलेले आहेत. स्वच्छता ठेवल्यास घर आजारांपासून दूर राहते. परंतु यामध्ये अनेकजण अत्यंत निष्काळजी असतात, अशा घरात नेहमीच नकारात्मकता असते आणि रोग, भांडणे इत्यादी कायम असतात. गरुड पुराणात घरात शांती आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी घराला सुव्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणे आणि स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घ्यावी असे म्हणतात. घरात सकारात्मकता आणण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केल्यावर आंघोळ करुन पूजा करावी. यामुळे घराचे वातावरण शुद्ध राहते.

रात्री उष्टी भांडी तशीच ठेवणे

बहुतेकदा घरी रात्री उशिरा जेवण झाल्यावर उष्टी भांडी स्वयंपाकघरातील सिंकमध्ये तशीच सोडली जातात. परंतु यामुळे घराच्या सदस्यांमध्ये फूट पडते आणि भांडण वाढतात. घराला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवण्यासाठी ही सवय बदला आणि रात्रीची भांडी रात्रीच धुवा.

According To Garuda Purana These Three Habits Are Responsible For Quarrels And Tribulations In The Family

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

June Month Festival List 2021 | जून महिन्यात सूर्यग्रहण, सोम प्रदोष व्रत, वट सावित्रीसह अनेक सण, जाणून घ्या पूर्ण यादी

Rahu Kaal | राहूकाळात चुकूनही कुठलं शुभ कार्य करु नये, अन्यथा अडचणी संपणार नाही, जाणून घ्या कधी असतो राहूकाळ

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख