Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख

सनातन धर्मात गरुड पुराणाला (Garuda Purana) अत्यंत महत्त्वाचा आणि महापुराण मानलं जातं. या महापुराणात भगवान नारायणाच्या भक्तीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे.

Garuda Purana | 'या' सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख
Garuda Purana

मुंबई : सनातन धर्मात गरुड पुराणाला (Garuda Purana) अत्यंत महत्त्वाचा आणि महापुराण मानलं जातं. या महापुराणात भगवान नारायणाच्या भक्तीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. हे सहसा एखाद्याच्या मृत्यूनंतर ऐकले जाते. कारण, गरुड पुराणाला मृत्यूनंतर मोक्ष प्रदान करणारे मानले जाते. एकीकडे मृत्यूचे गुढ गरुड पुराणात सांगितले गेले आहे, तर दुसरीकडे भक्ती, ज्ञान, वैराग्य, पुण्य, निष्काम कर्म, यज्ञ, तपश्चर्या, दान आणि विशेष फळांचा उल्लेख करण्यात आला
आहे (Garuda Purana Says These 5 Habits Of People Makes Goddess Lakshmi Angry).

एकूणच या गरुड पुराणात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्याचा अवलंब करुन लोक त्यांचे जीवन सुधारु शकतात. या प्रकरणात, गरुड पुराणात अशा काही सवयी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि लोकांना आर्थिक समस्या भोगाव्या लागतात. या सवयी लवकरात लवकर सोडलेल्याच बऱ्या.

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम्
सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम्

1. जे लोक अस्वच्छ कपडे घालतात, देवी लक्ष्मी त्यांचा त्याग करते. श्रीमंत असणे किंवा गरिब असणे हे आपल्या हातात नसते. परंतु आपण प्रत्येक परिस्थितीत स्वच्छता ठेवूच शकतो. म्हणून नेहमी स्वच्छतेची काळजी घ्या आणि स्वच्छ कपडे घाला.

2. जे लोक दात स्वच्छ करीत नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नसते. येथे दात स्वच्छ करणे म्हणजे शरीराची स्वच्छता, म्हणजे आळशीपणामुळे आपले दात स्वच्छ न करणार्‍याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कधीच मिळत नाही. म्हणून कपड्यांसह आपल्या शरीराच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या.

3. ज्या लोकांचं लक्ष सदैव खाण्यात असते, जे गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खातात आणि पूर्ण वेळ फक्त खाण्याचा विचार करतात, अशा लोकांकडे कधीही लक्ष्मी येत नाही. कारण हे जीवन कर्म करण्याकरिता आहे. यामध्ये अन्नाला फक्त आपल्या जगण्यासाठीचे साधन बनवण्यात आले आहे.

4. ज्या घरात लोक एकमेकांचा आदर करत नाहीत, जेथे नेहमी भांडणे होत असतात. जिथे बोलण्यात नेहमी कठोरपणा असतो, तिथे देवी लक्ष्मीचा कधीही निवास नसतो. म्हणून आपले बोलणे नेहमीच गोड ठेवा आणि घरात शांतता ठेवा.

5. गरुड पुराणात सकाळ आणि संध्याकाळची वेळ देवाचे स्मरण करणे आणि व्यायाम इत्यादीसाठी सांगण्यात आली आहे. जे लोक खूप आळशी असतात, जे सूर्योदय आणि सूर्यास्तानंतरही झोपलेले असतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी नेहमीच अप्रसन्न असते.

Garuda Purana Says These 5 Habits Of People Makes Goddess Lakshmi Angry

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Mohini Ekadashi 2021 | भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार का घेतला होता? जाणून घ्या…

Chanakya Niti : असे धन, सौंदर्य आणि विद्या असते निरर्थक, आचार्य चाणक्य काय सांगतात

हवन केल्याने वास्तु आणि ग्रह दोषातून मुक्तता मिळेल, जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI