Mohini Ekadashi 2021 | भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार का घेतला होता? जाणून घ्या…

एकादशी व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला केला जातो (Mohini Ekadashi 2021). एका वर्षात 24 एकादशी असतात.

Mohini Ekadashi 2021 | भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार का घेतला होता? जाणून घ्या...
lord vishnu

मुंबई : एकादशी व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला केला जातो (Mohini Ekadashi 2021). एका वर्षात 24 एकादशी असतात. दर महिन्याला एकादशीचे एक वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. यावेळी मोहिनी एकादशी 23 मे 2021 रोजी आहे (Mohini Ekadashi 2021 Know Everything About Lord Vishnus Mohini Avtar).

एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की, या दिवशी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दुःख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधनं आणि मोहमायेतून मुक्त होतात. भगवान विष्णूने मोहिनीचे रुप का धारण केले होते ते जाणून घेऊया –

भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार का घेतला?

धर्मग्रंथांनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये यावरुन वाद उद्भवला. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. अमृत ​​कलशापासून राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. यानंतर सर्व देवतांनी अमृतपान केले. या दिवशी वैशाख महिन्याची एकादशीची तिथी होती, म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. हे व्रत भगवान राम आणि युधिष्ठिर यांनी देखील ठेवला होता.

पूजेचा शुभ मुहूर्त

एकादशीची तिथी प्रारंभ – 22 मे 2021 शनिवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांपासून

एकादशीची तिथी समाप्त – 23 मे 2021 सकाळी 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत

एकादशी पाराणा शुभ मुहूर्त – 24 मे रोजी सकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत

मोहिनी एकादशीचे महत्त्व

मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मोहिनी म्हणून पूजा केली जाते. यादिवशी भाविक निंदा, लोभ, द्वेष इत्यादी भावनांचा त्याग करुन भगवान विष्णूंची प्रार्थना करतात. या दिवशी सकाळी स्नान करुन भगवान सूर्याला अर्घ्य द्या. यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. पूजेमध्ये तुळस, फुले, फळे आणि पंचामृत अर्पण करा. या दिवशी भाविक फलाहार करतात आणि दुसर्‍या दिवशी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर स्वतः उपवास सोडतात.

मोहनी एकादशीच्या दिवशी राम रक्षा स्त्रोत्राचं पठन करावे. या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नये, रागावू नये. उपवासाच्या दुसर्‍या दिवशी गरीब व्यक्तीला अन्न-धान्य दान करा.

Mohini Ekadashi 2021 Know Everything About Lord Vishnus Mohini Avtar

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chitragupta Jayanti 2021 | भगवान यमराजांचे खास चित्रगुप्त, जाणून घ्या त्यांच्या जन्माची कथा

Varuthini Ekadashi 2021 : 7 मे रोजी वरुथिनी एकादशी, या दिवशी ‘ही’ कामं चुकूनही करु नये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI