June Month Festival List 2021 | जून महिन्यात सूर्यग्रहण, सोम प्रदोष व्रत, वट सावित्रीसह अनेक सण, जाणून घ्या पूर्ण यादी

June Month Festival List 2021 | जून महिन्यात सूर्यग्रहण, सोम प्रदोष व्रत, वट सावित्रीसह अनेक सण, जाणून घ्या पूर्ण यादी
June Festival list

सनातन धर्मात प्रत्येक देवी-देवतेसाठी कुठली ना कुठली तिथी निश्चित केली गेली आहे (June Month Festival List 2021). या तिथीला त्यांची विशेष पूजा केली जाते.

Nupur Chilkulwar

|

May 27, 2021 | 10:21 AM

मुंबई : सनातन धर्मात प्रत्येक देवी-देवतेसाठी कुठली ना कुठली तिथी निश्चित केली गेली आहे (June Month Festival List 2021). या तिथीला त्यांची विशेष पूजा केली जाते. त्याचबरोबर काही असेही व्रत आहेत जे दर महिन्याला येतात. येत्या मंगळवारपासून जून महिना सुरु होणार आहे. या महिन्यातच 2021 वर्षाचे पहिले सूर्यग्रहण आणि वर्षातलं दुसरं ग्रहण लागेल. तसेच सुवासिनींचा विशेष सण वट सावित्री व्रत आणि शनि जयंतीही जून महिन्यात होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, कोणत्या दिवशी कोणता उत्सव होणार आहे हे जाणून घेऊया (Vat Savitri Solar Eclipse Shani Jayanti June Month Festival List 2021 According To Hindu Panchang) –

💠 02 जून : कालाष्टमी

🔶 06 जून : अपरा एकादशी

💠 07 जून : सोम प्रदोष व्रत

🔶 08 जून : मासिक शिवरात्र

💠 10 जून : रोहिणी व्रत, वट सावित्री व्रत, अमावस्या, शनि जयंती

🔶 13 जून : महाराणा प्रताप जयंती

💠 14 जून : विनायक चतुर्थी

🔶 20 जून : पितृ दिवस, गंगा दशहरा

💠 21 जून : निर्जला एकादशी

🔶 22 जून : भौम प्रदोष

💠 24 जून : ज्येष्ठ पौर्णिमा

🔶 27 जून : संकष्टी चतुर्थी

10 जून हा एक खास दिवस असेल

यावेळी जून महिन्यात 10 जूनचा दिवस खूप खास असेल. कारण, या दिवशी तीन विशेष गोष्टी एकत्र असतील. 2021 वर्षाचे पहिले सूर्यग्रहण 10 जून रोजी होईल. हे पूर्ण ग्रहण नसेल. परंतु भारतासह कॅनडा, युरोप, रशिया, ग्रीनलँड, आशिया आणि उत्तर अमेरिकेत हे पाहिले जाऊ शकते.

याशिवाय, वट सावित्री व्रतही 10 जूनला ठेवण्यात येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला ठेवला जातो. हा दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि वटवृक्षाची पूजा करतात आणि वट सावित्री व्रताची कथा ऐकतात.

दुसरीकडे, शनि जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शनिदेव यांचा जन्म झाल्याचा समज आहे. नवग्रहांमध्ये शनिदेव अतिशय विशेष मानले जातात. अशा स्थितीत शनि जयंतीच्या दिवशी शनिपूजन आणि दान इत्यादींना विशेष महत्त्व दिले जाते. शनिदेवाशी संबंधित असलेल्या समस्यांशी झुंज देत असलेले लोक या दिवशी शनिदेवाची पूजा करुन आणि दान देऊन आशीर्वाद प्राप्त करु शकतात.

Vat Savitri Solar Eclipse Shani Jayanti June Month Festival List 2021 According To Hindu Panchang

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Narad Jayanti 2021 | नारद मुनी भगवान ब्रह्माचे मानस पुत्र कसे झाले? जाणून घ्या यामागील कहाणी आणि या दिवसाचं महत्त्व

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांतील व्यक्तिरेखा कोणत्या, जाणून घ्या…

Zodiac Signs | ‘या’ चार राशीच्या व्यक्ती जन्मापासूनच असतात हुशार आणि क्रिएटिव्ह

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें