वास्तूशास्त्रानुसार घरात श्री यंत्र बसवल्याने मिळतात ‘हे’ अनेक फायदे, जाणून घ्या पद्धत

हिंदू धर्मात माता लक्ष्मी आणि धनाची देवी म्हणून श्रीयंत्राला मानले जाते. तिच्या कृपेने संपत्ती आणि समृद्धी मिळते. तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र बसवल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात...

वास्तूशास्त्रानुसार घरात श्री यंत्र बसवल्याने मिळतात हे अनेक फायदे, जाणून घ्या पद्धत
| Edited By: | Updated on: Oct 25, 2025 | 4:38 PM

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळवी यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तर आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये धन कमविण्याचे अनेक मार्ग सांगितले आहे. त्यात ज्या व्यक्तीला धनाची देवता आशीर्वाद मिळतो त्याच्या घरात कधीही गरिबी राहत नाही. अशातच तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही घरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी. असे मानले जाते की श्री यंत्राची दररोज पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की श्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे. त्यात महालक्ष्मी वास करते. त्यामुळे श्रीयंत्र तुम्ही ज्या ठिकाणी ठेवला जातो तेथील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. तर आजच्या लेखात आपण घरी श्री यंत्र स्थापित करण्याची पद्धत आणि त्याचे कोणते फायदे आपल्याला होतात ते जाणून घेऊयात.

अशा प्रकारे श्री यंत्र करा स्थापित

श्री यंत्राची स्थापना करण्यापूर्वी ते कच्च्या दुधाने आणि गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे श्रीयंत्र स्वच्छ लाल कापडावर किंवा कमळाच्या फुलावर ठेवा आणि देवघराच्या पूर्व दिशेला स्थापित करा. आता श्रीयंत्रा समोर दिवा लावा, त्यावर फुले, तांदूळ, कंकू अर्पण करा आणि योग्यरित्या पूजा करा. या दरम्यान, ‘ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मायै नमः’ किंवा ‘ओम महालक्ष्मायै च विद्महे विष्णु पत्न्यायै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्’ या मंत्रांचा जप करा.

तुम्हाला हे फायदे मिळतात

हिंदू ग्रंथाच्या मान्यतेनुसार, घरात श्री यंत्र स्थापित केल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहते.

श्रीयंत्र सकारात्मक उर्जेचा प्रसार राखण्यास आणि नकारात्मक उर्जेला दूर करण्यास देखील मदत करते. यामुळे वास्तुदोषांपासूनही मुक्तता मिळू शकते.

श्री यंत्र स्थापित करून त्याची नियमित पूजा केल्याने व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा

श्रीयंत्र स्थापित केल्यानंतर तुम्ही दररोज त्याची विधिवत पूजा करावी. लक्ष्मी देवीचे मंत्र जप करणे देखील फायदेशीर ठरू शकते. श्रीयंत्र स्थापित करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)