iPhone 18 ची मोठी वार्ता; ना सिमची चिंता, नो कनेक्शनचा मॅसेज विसरा, गेम चेंजर फीचरसह ॲप्पलचा मोठा धमाका
Apple iPhone 18 : ॲप्पलच्या आयफोन 17 ने सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. तर आता आयफोन 18 ची वार्ता येऊन धडकली आहे. हा स्मार्टफोन बाजारात गेम चेंजर ठरणार आहे. काय आहे या फोनचे वैशिष्ट्ये?

iPhone 18 pro starlink satellite internet : आता 5G वा 6G च्या फुशारक्या मारणं बंद होणार आहे. Apple आता थेट अंतराळातून इंटरनेट घेणार आहे. तंत्रज्ञान आता खुप पुढे गेले आहे. ॲप्पलच्या आयफोन 18 ची ती वार्ता उघड झाली आहे. पुढील वर्षी 2026 मध्ये iPhone 18 Pro हा केवळ एक फोन नाही तर दळणवळण क्षेत्रातील क्रांती ठरणार आहे. ताज्या अहवालानुसार, Apple, Elon Musk ची कंपनी SpaceX च्या Starlink सॅटेलाईट इंटरनेट सपोर्टसह प्रीमियम iPhone मॉडल्स बाजारात उतरवणार आहे. त्यामुळे या फोनमध्ये सिमची गरज नसेल आणि तुम्ही जगाच्या कोपऱ्यात जरी असाल तरी तिथे नो सिग्नल, नो कनेक्शन असा मॅसेज येणार नाही.
Globalstar ते Starlink पर्यंत
आतापर्यंत Apple ने त्यांच्या iPhones मध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसाठी Globalstar चा वापार केला आहे. ही सुविधा केवळ अत्यावश्यक SOS फीचर्सपर्यंत मर्यादित आहे. म्हणजे त्याचा वापर केवळ अत्यंत बिकट परिस्थितीत, संकट काळात, जीव वाचवण्यासाठी करण्यात येत होता. पण आता त्याचा वापर विस्तारणार आहे. iPhone 18 Pro मध्ये Starlink ची एंट्री होत आहे. युझर्सला सर्वात वेगवान सॅटेलाईट इंटरनेट मिळेल. तीन-तीन तासांचे चित्रपट अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड होतील. तर दऱ्याखोऱ्यात जरी हरवला तर तुमच्या फोनचे सिग्नल तुटणार नाही.
सध्या Starlink इंटरनेटचा थेट iPhones मध्ये वापर करण्यासाठी T-Mobile सारख्या नेटवर्कची गरज असते. कारण Apple आणि SpaceX यांच्यात थेट कोणताही करार नाही. पण त्यादिशेने दोन्ही कंपन्या काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अँटिना आणि चिपसेट
iPhone 18 Pro मध्ये ॲडव्हान्स हार्डवेअर अपग्रेड करण्यात येईल. त्यात या स्मार्टफोनमध्ये अँटिना आणि चिपसेट लावण्यात येईल आणि युझर्सला त्याच्या स्मार्टफोनमध्ये Starlink सॅटेलाईटचे सिग्नल डिकोड करता येतील. त्याचा अर्थ डोंगरदऱ्या, समुद्रात अथवा दाट जंगलात, दुर्गम भागात कोणत्याही अडथळ्या विना तुम्ही जगाशी कनेक्ट राहाल. इंटरनेट सुरू असेल.
Starlink भारतात काही परवानग्या नंतर सुरु होईल. पण ताज्या अहवालानुसार, 2026 च्या सुरुवातीला स्टारलिंकची सुरुवात होईल. त्यानंतर लागलीच iPhone 18 Pro हा लाँच होण्याची दाट शक्यता आहे.
