वास्तुशास्त्रानुसार, घरातील समृद्धी आणि आनंदाची 7 चिन्हे कोणती आहेत? कशी ओळखावी?
वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही शुभ चिन्हे आनंद आणि समृद्धी दर्शवतात. घरातील काही गोष्टींमुळे किंवा काही चिन्हांमुळे घरातील ऊर्जा कशी आहे हे समजते. जसं की घरात सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक हे घरातील काही संकेतावरून समजून येते. नक्की कोणती आहेत ते संकेत किंवा चिन्ह. चला जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येण्याची काही चिन्हे दिसत असतात. फक्त त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. घराच्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा केवळ नातेसंबंधांना गोड बनवत नाही तर आरोग्य सुधारते आणि समृद्धी वाढवते. वास्तुशास्त्र सांगते की काही संकेत असे असतात जे सूचित करतात की घरात आनंद, शांती आणि समृद्धी वास करते किंवा येणार आहे. जर हे संकेत किंवा चिन्हे तुमच्याही घरात असतील तर समजून जा की तुमचे घर हे आनंदाने आणि समृद्धीने भरलेले आहेत.
घरी तुळशीचे रोप असणे
वास्तुशास्त्र तुळशीला शुभ आणि पवित्र मानले जाते. म्हणूनच, तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोप असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे रोप केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते. तुळशीचे रोप घरात सतत पवित्रतेची भावना टिकवून ठेवते असे वास्तूशास्त्रात म्हटले गेले आहे.
पक्षांचा किलबिलाट
वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत दररोज पक्षी येत असतील. किलबिलाट करत असतील तर ते एक अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पक्ष्यांचा आवाज तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद आणू शकतो. तसेच जर हे पक्षी तुमच्या घरातही प्रवेश करत असतील तर नक्कीच घरात आनंद येण्याचे संकेत मानले जातात. कारण पक्षांना सकारात्मक ऊर्जा लगेच जाणवते.
घरात असणारे कारंजाचे शोपीस
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरात लहान कारंज्याचे शोपीस, फिशटँक किंवा वाहत्या पाण्याचा कोणताही स्रोत असणे अत्यंत शुभ मानले जाते. वाहत्या पाण्यामुळे पैशाचा आणि सकारात्मक उर्जेचा सतत प्रवाह राहतो. तसेच शोपीस नसेल किंवा फिशटँक नसेल तर त्याचा लहान चित्र किंवा पेंटींग लावणे देखील शुभ मानले जाते.
मुख्य दरवाजावर स्वच्छता आणि शुभ चिन्हे
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा उर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणून, दारावर स्वस्तिक, शुभ लाभ किंवा रांगोळी घालणे शुभ मानले जाते. तसेच दारासमोर नेहमी स्वच्छता राखणे हे सुख आणि समृद्धीचे लक्षण आहे.
घरात असलेल्या मूर्ती आणि प्रार्थनास्थळांमुळे शांती मिळते.
वास्तु तज्ज्ञांच्या मते, जर पूजास्थळ शांततेची भावना निर्माण करत असेल तर ते घरात सकारात्मक उर्जेचे लक्षण आहे. घराच्या मंदिरातून येणारा घंटानाद आणि अगरबत्तींचा सुगंध वातावरण शुद्ध करतो.
घरातील रोप सांगतात घरातील ऊर्जा
जर तुमच्या घरातील रोपे हिरवीगार आणि निरोगी राहिली तर ते एक चांगले लक्षण मानले आहे. रोपे हिरवीगार आणि निरोगी राहणे म्हणजे घरातील सकारात्मकता दर्शवते. तसेच घरातील आनंदाचे प्रतीक मानले जाते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, घरात सुकलेले किंवा कोमेजलेले रोप ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच घरातील रोपे वारंवार सुकत असतील तर घरातील ऊर्जा ही नकारात्मक असल्याचे संकेत असतात.
कुटुंबातील सदस्यांचे आनंदी असणे
वास्तुशास्त्रानुसार, सर्वात शुभ लक्षण म्हणजे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम, आदर आणि आनंद असणे. वास्तूशास्त्रानुसार जिथे कुटुंबात प्रेम असते तिथे देवी लक्ष्मी आणि सुख, शांती नांदते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
