Chanakya Niti : निकटवर्तीयांशीही ‘या’ पाच गोष्टी कधीहीह शेअर करु नये, आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा सल्ला

कुशल राजकारणी होण्याबरोबरच आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक उत्तम वक्ते आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या ग्रंथात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:42 AM, 4 May 2021
Chanakya Niti : निकटवर्तीयांशीही 'या' पाच गोष्टी कधीहीह शेअर करु नये, आचार्य चाणक्य यांचा महत्त्वाचा सल्ला
Acharya_Chanakya

मुंबई : कुशल राजकारणी होण्याबरोबरच आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक उत्तम वक्ते आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या ग्रंथात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे अनुसरण करुन, एखादी व्यक्ती मोठा कपट आणि फसवणूक टाळू शकते. जीवनातल्या अनेक अडचणींवर सहज विजय मिळवू शकतो (Acharya Chanakya Advised To Never Share These Five Things With Anyone In Chanakya Niti).

या भागामध्ये आचार्य यांनी पाच गोष्टी गोपनीय ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाणक्य म्हणाले की या पाच गोष्टींबद्दल आपल्या अगदी निकटवर्तीयांनाही सांगू नये, अन्यथा भविष्यात त्या मोठ्या संकटात पडू शकता.

🔷 आपले दु:ख स्वतःपर्यंत मर्यादित ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते आपले दु:ख कधीही कोणालाही सांगू नये. ते स्वत:पर्यंत मर्यादित ठेवणे उत्तम असते. दुःख आणि वेदनांची चर्चा केल्याने ते अधिक वाढतं. ऐकणारा व्यक्ती समोर तर आपल्याला सहानुभूती दर्शवितो, परंतु तुमच्या मागे ते आपली चेष्टा करतात किंवा तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन त्याच्या दृष्टीकोनातून करतो.

🔶 आपले प्रेमसंबंध जाहीर करु नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुमच्या प्रेम संबंधांबाबत इतरांशी चर्चा करु नका. यामुळे भविष्यात आपल्यासाठी समस्या उद्भवू शकतात.

🔷 पैशांची चर्चा करु नका

पैशासंबंधी कोणत्याही अज्ञात व्यक्तीसमोर चर्चा करु नका. पैशांच्या बाबतीत कोणाच्याही हेतूवर विश्वास ठेवता येत नाही. कोणाचीही प्रामाणिकता कधीही डगमगू शकते. म्हणून पैशांच्या गोष्टी स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा.

🔶 कौटुंबिक कलह इतरांसमोर उघड करु नका

कुणासमोर कधीही आपल्या कुटूंबातील समस्या किंवा इतर कुठली वाईट गोष्ट इतरांसमोर करु नका. आज, जी व्यक्ती तुमचे बोलणे अत्यंत शांतपणे ऐकत आहे, ती भविष्यात तुमच्याबद्दल वाईट बोलण्यास मागेपुढे पाहणार नाही. म्हणून, कोणासमोर आपल्या प्रियजनांबद्दल वाईट बोलू नका नका.

🔷 कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

आचार्य चाणक्य म्हणायचे की बर्‍याचदा तेच लोक विश्वासघात करतात ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो. म्हणूनच, सर्वाधिक विश्वास स्वत:वर ठेवा आणि कोणावरही अवलंबून राहू नका.

Acharya Chanakya Advised To Never Share These Five Things With Anyone In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | मांसाहारापेक्षा 10 पट, धान्यापेक्षा 38 पट अधिक शक्तीवर्धक, प्रत्येकाने दररोज सेवन करावा हा पदार्थ

Chanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल