Chanakya Niti | अशा व्यक्तींकडे कधीही लक्ष्मी नांदत नाही, नेहमी राहतात कंगाल

आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. आचार्य चाणक्य यांना कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखले जाते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला आपल्या कुटनीतिने सम्राट बनवले. चाणक्य यांनी अनेक पुस्तके लिहिली. पण आजही लोकांना चाणक्य नीति वाचायला आवडते.

Chanakya Niti | अशा व्यक्तींकडे कधीही लक्ष्मी नांदत नाही, नेहमी राहतात कंगाल
Acharya-Chanakya

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. आचार्य चाणक्य यांना कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखले जाते. त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला आपल्या कुटनीतिने सम्राट बनवले. चाणक्य यांनी अनेक पुस्तके लिहिली. पण आजही लोकांना चाणक्य नीति वाचायला आवडते.

जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतिमध्ये लिहिलेल्या गोष्टींचे पालन केले तर त्याला जीवनात यश मिळते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या पुस्तकात त्या सवयींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे व्यक्तीकडे पैसा कधीच थांबत नाही. देवी लक्ष्मीची अशा लोकांवर कृपा नसते. त्यांचं जीवन नेहमीच गरिबीत जाते. याविषयी जाणून घेऊया –

उशिरापर्यंत झोपणारा

आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नसतो. असे लोक नेहमीच गरीब असतात. त्यांच्या मते, जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी राहते.

शारीरिक स्वच्छता न ठेवणारा

चाणक्य नीतिनुसार, जो माणूस कपडे स्वच्छ ठेवत नाही, जो दात स्वच्छ ठेवत नाही. अशा व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा नसते. शारीरिक स्वच्छता न राखणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जिथे स्वच्छता नाही, तिथे देवी लक्ष्मी वास करत नाही.

अति खाणारा

आचार्य चाणक्य म्हणतात की जास्त अन्न खाल्ल्याने देखील गरिबी येते. याशिवाय, आरोग्याशी संबंधित आजारही वाढतात.अशा लोकांना नेहमी अन्न आणि पैशांची समस्या असते. त्यांच्या घरातही समृद्धी राहत नाही.

कठोर बोलणारा

आचार्य चाणक्य म्हणतात की नेहमी गोड बोलावे. गोड बोलणारी व्यक्ती नेहमीच सर्वांना प्रिय असते. कठोर बोलणाऱ्या लोकांशी चांगले संबंध निर्माण होत नाहीत. देवी लक्ष्मीसुद्धा अशा घरात राहत नाही.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे दोव गुरु मंत्र लक्षात असू द्या…

Chanakya Niti | जर तुमच्या आयुष्यात ही दोन नाती असतील तर तुमच्यापेक्षा श्रीमंत या जगात कोणी नाही

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI