AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amarnath Yatra 2022: आजपासून पूर्ववत होणार अमरनाथ यात्रा; ढगफुटीनंतर कसे असणार यात्रेचे स्वरूप?

जम्मू,  पवित्र गुहेजवळ ढगफुटीच्या (cloudburst)  घटनेनंतर अंशत: स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा (Amarnath yatra) आज सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाली (Resume). जम्मू बेस कॅम्पवरून अमरनाथ यात्रेकरूंचा नवीन तुकड्यांनी येण्यास सुरुवात केली आहे. “आम्ही ऊर्जेने भरलेलो आहोत आणि बाबांच्या दर्शनाशिवाय परत जाणार नाही. यात्रा पुन्हा सुरू झाल्याचा आम्हाला आनंद आहे. सीआरपीएफ आणि इतर जवानांनी मार्गदर्शन केले. […]

Amarnath Yatra 2022: आजपासून पूर्ववत होणार अमरनाथ यात्रा; ढगफुटीनंतर कसे असणार यात्रेचे स्वरूप?
| Updated on: Jul 11, 2022 | 9:30 AM
Share

जम्मू,  पवित्र गुहेजवळ ढगफुटीच्या (cloudburst)  घटनेनंतर अंशत: स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा (Amarnath yatra) आज सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाली (Resume). जम्मू बेस कॅम्पवरून अमरनाथ यात्रेकरूंचा नवीन तुकड्यांनी येण्यास सुरुवात केली आहे. “आम्ही ऊर्जेने भरलेलो आहोत आणि बाबांच्या दर्शनाशिवाय परत जाणार नाही. यात्रा पुन्हा सुरू झाल्याचा आम्हाला आनंद आहे. सीआरपीएफ आणि इतर जवानांनी मार्गदर्शन केले. आम्ही सुरक्षितपणे पुढे जाऊ,”  असा विश्वास यात्रेकरूंना व्यक्त केला . ढगफुटीच्या घटनेनंतर अंशतः स्थगित केलेली अमरनाथ यात्रा सोमवारी नुनवान पहलगाम बाजूने पुन्हा सुरू होईल, अशी माहिती श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने रविवारी दिली. बालटाल बेस कॅम्पवर यात्रेकरू पुन्हा यात्रा सुरू होण्याची वाट पाहत होते. अमरनाथ गुहेच्या मंदिराजवळ शुक्रवारी ढगफुटीमुळे पूर आल्याने सोळा जणांचा मृत्यू झाला याशिवाय अद्यापही 36 जण बेपत्ता आहेत.

दोन्ही बाजूंनी बालटाल आणि हेलिकॉप्टर उपलब्ध असतील.

IAF Mi-17 V5 आणि चित्ता हेलिकॉप्टरने आज अतिरिक्त 34 जखमी यात्रेकरूंना बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आयएएफच्या हेलिकॉप्टरने एनडीआरएफच्या 20 जवानांसह सहा श्वानांसह हवाई वाहतूक केली. अमरनाथ पवित्र मंदिराजवळ शुक्रवारी ढगफुटीमुळे पडलेल्या ढिगाऱ्याखाली वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराने रविवारी झेव्हर 4000 रडार समाविष्ट केले. तत्पूर्वी, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) मनोज सिन्हा यांनी रविवारी पहलगाम येथील बेस कॅम्पला भेट दिली आणि यात्रेकरूंची भेट घेतली. “सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासनाने सक्षम बचाव कार्य केले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्याबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. मार्गाच्या दुरुस्तीसह यात्रा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात्रेकरूंनी यावे, आम्ही त्यांना सर्व सुविधा देऊ.” सिन्हा यांनी आश्वासन दिले.

उपचारानंतर 35 यात्रेकरूंना डिस्चार्ज

35 यात्रेकरूंना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. 17 लोक अद्यापही उपचार घेत आहेत आणि आज रात्री त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.  गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना विमानाने श्रीनगरला नेण्यात आले.

युद्ध स्थरावर बचावकार्य सुरु

शनिवारी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या आकडेवारीनुसार, अमरनाथच्या पवित्र मंदिराजवळ ढग फुटण्याच्या घटनेत  16 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी अमरनाथ मंदिरात बचाव आणि मदत कार्यासाठी भारतीय हवाई दलाची चार Mi-17V5 आणि चार चित्ता  हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती. या घटनेत अडकलेल्या  45 लोकांना बाहेर काढण्यासाठी चित्ता हेलिकॉप्टरने 45 उड्डाण केले, ज्यात एनडीआरएफ आणि लष्कराचे पाच जवान आणि 3.5 टन मदत सामग्री होती.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.