Amavasya: या तारखेला आहे वर्षातली शेवटची अमावस्या, अमावस्येच्या दिवशी या चूका अवश्य टाळा

डिसेंबर महीन्याच्या या तारखेला वर्षातली शेवटची अमावस्या. अमावस्येच्या दिवशी चुकूनही हे काम करू नये.

Amavasya: या तारखेला आहे वर्षातली शेवटची अमावस्या, अमावस्येच्या दिवशी या चूका अवश्य टाळा
अमावस्या
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 17, 2022 | 2:45 PM

मुंबई, हिंदू धर्मात अमावस्या (Poush Amavashya) तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी अनेक धार्मिक कार्ये केली जातात. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी पितरांचे श्राद्ध, दान, स्नान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. पितृदोष (Pitrudosh) आणि कालसर्प दोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेकजण या दिवशी उपवास करतात. पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करणे सर्वात विशेष मानले जाते. पौष अमावस्येचा काळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.

पौष अमावस्या काळ

पौष अमावस्या 23 डिसेंबर रोजी असेल. पौष अमावस्या तिथी 22 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 07.13 वाजता सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी दुपारी 03.46 वाजता समाप्त होईल.

पौष अमावस्या पूजा पद्धत

पौष अमावस्येला पितरांना तर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी लोकं पवित्र नद्या, जलाशय किंवा तलावांमध्ये स्नान करतात आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर पितरांच्या नावे पिंडदान करतात. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मीक मान्यता आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुले सूर्यदेवाला अर्पण करावीत.

या दिवशी दान आणि दक्षिणा कार्य देखील करावे. या दिवशी तुम्ही कोणतीही पांढरी वस्तू किंवा अन्नपदार्थ दान करू शकता.अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याचा विधी आहे.

 

पौष अमावस्येच्या दिवशी चुकूनही हे काम करू नये

 

  1.  पौष अमावस्येची रात्र ही सर्वात काळी रात्र मानली जाते, त्यामुळे या दिवशी घरातून बाहेर पडू नये.
  2.  पौष अमावस्येच्या दिवशी लवकर उठून पूजा करावी, या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये.
  3.  या दिवशी मांस, मद्य आणि तामसी अन्न सेवन करू नये.
  4.  या दिवशी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. कोणाचाही अपमान होता कामा नये.
  5.  या दिवशी कोणत्याही गरीब व्यक्तीचा अपमान करू नये. ब्राह्मण आणि गरीबांना दान द्यावे.

 

पौष अमावस्येचे महत्व

पौष अमावस्येच्या दिवशी कुठल्यातरी तीर्थक्षेत्री ब्राह्मणांना अन्नदान करून पितरांना प्रसन्न केले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांना अमावस्येच्या दिवशी विशेष पूजा करून दोषापासून मुक्ती मिळू शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)