Margashirsh Amavasya 2022: आज मार्गशीर्ष अमावास्या, आजच्या दिवशी ‘या’ पाच चुका अवश्य टाळा

आज मार्गशीर्ष अमावस्या आहे. या दिवशी काही नियमांचे पालन करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. जाणून घेऊया कोणकोणते नियम आहेत.

Margashirsh Amavasya 2022: आज मार्गशीर्ष अमावास्या, आजच्या दिवशी 'या' पाच चुका अवश्य टाळा
मार्गशीर्ष अमावस्या
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Nov 23, 2022 | 10:06 AM

मुंबई, आज मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या (Margashirsh Amavasya) आहे. ही अमावस्या मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली जाते. याला अघन अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते की, अमावस्येच्या रात्री भूत, पूर्वज, पिशाच आणि निशाचर यांसारख्या नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. म्हणूनच अमावस्येला काही चुका अवश्य टाळावे.

  1. स्मशानभूमीपासून दूर राहा- अमावस्येच्या रात्री स्मशानभूमी परिसरात जाणे टाळावे. तसेच रात्री निर्जन रस्त्यावर जाणेदेखील टाळावे. असे म्हटले जाते की अमावस्येच्या दिवशी सहजपणे नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे अशा लोकांनी सावध राहावे.
  2. उशिरापर्यंत झोपू नका- अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकत नाही. या दिवशी सूर्योदयानंतर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
  3. भांडणांपासून दूर राहा- अमावस्येच्या दिवशी वादविवादांपासून दूर राहावे. अमावस्येला ज्या घरात वादविवाद होतात, त्या घरात पितरांचा आशीर्वाद राहत नाही असे म्हणतात. म्हणूनच या दिवशी घरात शांततेचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. अमावस्येला कोणावरही रागावू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.
  4. तामसिक भोजन – मार्गशीर्ष अमावस्येला तामसिक पदार्थांचे सेवन करू नका. या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा वापरू नये. या दिवशी मांस, मासे आणि मद्य प्राशन करू नये.
  5. शारीरिक संबंध- अमावस्येच्या दिवशी पती-पत्नीनेही शारीरिक संबंध करणे टाळावे. असे म्हटले जाते की चौदस, अमावस्या आणि प्रतिपदा अशा तीन तिथी आहेत जेव्हा आपण शरीर आणि मन दोन्हीपासून पूर्णपणे शुद्ध राहिले पाहिजे.

 अमावस्या तिथी आणि वेळ

मार्गशीर्ष अमावस्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 06.53 वाजता सुरू होईल आणि गुरुवार, 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 04.26 वाजता समाप्त होईल.

शास्त्रात या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर पितरांना तर्पण आणि भोजन अर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबियांना सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांसाठी असहाय्य आणि गरीब लोकांना अन्नदान करा. असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होऊन संपत्ती येते.

पिंपळाच्या झाडाची पूजा करा

मार्शिश अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पीपळाची पूजा केल्यास विशेष फळ मिळते. सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळास दूध आणि पाणी अर्पण करावे. पूजेनंतर 11 परिक्रमा करा. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें