तुमच्याही घरात वास्तुदोष आहे? मग या चार गोष्टी घरात ठेवाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या घरात ठेवतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसंच अशा देखील काही गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होतो.घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या नसाव्यात, तुमच्या घरात जर एखादी विशिष्ट वस्तू असेल तर तिची दिशा कोणती असावी, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? देवघर कोणत्या दिशेला असावं? अशा असंख्य प्रश्नांची उत्तर देण्यात आली आहे. एवढंच नाही तर जर समजा तुम्हाला एखाद्या कामात अडथळा निर्माण होत असेल, जर वारंवार अडचणी येत असतील, अचानक मोठी संकट येत असतील तर ती दूर कशी करायची? यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या घरात ठेवतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तसंच अशा देखील काही गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होतो.घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात सुख, समृद्धी येते, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
नारळ – वास्तुशास्त्रात नारळाला खूपच शुभ मानलं जातं. तसेच नारळ हे लक्ष्मी मातेचं आवडतं फळ आहे, अशी देखील मान्यता आहे, त्यामुळे नारळ नेहमी तुमच्या देवघराजवळ अथवा तिजोरी जवळ असावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नारळामुळे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, घरात सुख शांती येते.
पिरॅमिड – घरामध्ये पिरॅमिड असणं हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं गेलं आहे, पिरॅमिडमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. घरात सुख, शांती येते, समृद्धी येते, सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात.
कवडी – कवडी ही लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय वस्तू आहे, लक्ष्मी पूजनामध्ये या कवडीला खूप महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनानंतर ही कवडी एका लाल कापडामध्ये बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा, तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील.
श्री यंत्र – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर तुमच्या घरात श्री यंत्राची स्थापना केली तर तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात, घरात आर्थिक बरकत येते, वातावरण स्थिर राहातं.
