
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि राजनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. आजही या गोष्टी व्यक्तीला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आयुष्य जगत असताना व्यक्तीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी करू नयेत याबाबत सांगितलं आहे. राजा कसा असावा? राजाचा आपल्या प्रजेसोबत व्यवहार कसा असावा, आपला मित्र कोण आहे? आपला शत्रू कसा ओळखावा? कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचा व्यवहार कसा असावा? अशा अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात जगात तुम्हाला कोणतीही वस्तू , व्यक्ती परत मिळू शकते. मात्र आई-वडील हे असे असतात ते फक्त एकदाच मिळतात. जगात जर निस्वार्थ प्रेम कोणाचं असेल तर ते फक्त तुमच्या आई-वडिलांचं असतं. आई वडील आपल्या मुलांकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. मुलांना मोठं करण्यासाठी त्याला स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आई-वडील हे दोन व्यक्ती दिवसरात्र कष्ट करत असतात, त्यामुळे तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे.
जेव्हा तुमचे आई -वडील तुम्हाला एखादी गोष्ट सांगतील ती काळजीपूर्वक ऐका, कारण त्यातच तुमचं हीत आहे. कारण तुम्हाला तुमचे आई वडील कधीच कोणती चुकीची गोष्ट सांगू शकत नाहीत, त्यामुळे आई-वडील जे सांगतात त्याचं पालन करा, तुम्हाला यश निश्चित मिळेल. आर्य आचणक्य पुढे म्हणतात तुम्ही तुमच्या आई वडिलांचा कधीच अपमान करू नका, त्यांना उलट उत्तर देऊ नका, त्यांना वाईट वाटेल अशी कोणतीही कृती करू नका, त्यातच तुमचं भलं आहे. आई वडिलांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही चालत राहिलात तर एक दिवस नक्कीच तुम्ही यशस्वी व्यक्ती व्हाल असं आर्य चाणक्य म्हणतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)