AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astro Tips : घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर… नक्की ट्राय करा

तुरटी हा एक चमत्कारिक पदार्थ आहे जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो आणि आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. तुरटीचा योग्य वापर करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो, संपत्ती वाढवू शकतो, मानसिक शांती मिळवू शकतो. चला तर जाणून घेऊया वास्तूदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा?

Astro Tips : घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी 'हा' पदार्थ ठरेल फायदेशीर... नक्की ट्राय करा
Alumm Upay
| Edited By: | Updated on: Feb 11, 2025 | 3:50 PM
Share

तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जाणवते का? तुमच्या आयुष्यात सतत समस्या येत आहेत का? तर तुरटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुरटीचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. अनेक वर्षांपूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जायचा. परंतु तुम्हाला माहिती आहे का वास्तूशास्त्रामध्ये तुरटीचे अनेक उपाय सांगितले आहेत. शतकानुशतके वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. तुमच्या घरातील वास्तू वास्तूशास्त्राप्रमाणे नसेल तर वास्तू दोष निर्माण होतो. घरामध्ये वास्तूदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात.

तुरटीचा वापर तुमच्या घरातील वास्तूदोष कमी करण्यसाठी केला जातो. तुमच्या घरामध्ये जर वास्तूदोष असेल तर तो दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. अनेकांचा प्रश्न पडतो की तुरटीचे नेमकं वास्तूशास्त्रानुसार काय फायदे आहेत चला तर जाणून घेऊया. तुरटी घरात असलेल्या नकारात्मक उर्जेचा नाश करते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवते. त्यासोबतच तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते.

तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकतो. तुरटीच्या वापरामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती वाढते. तुम्हाला मानसिक तणावाच्या समस्या असतील तर तुरटी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुरटीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आसतात ज्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. घरातील प्रत्येक खोलीत तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी पावडर मिसळा, यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटीचा दिवा लावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. घरात तुरटीचा स्फटिक ठेवा. यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तुमच्या घराच्या बाथरूममध्ये तुरटीने भरलेला एक वाटी ठेवा. यामुळे वास्तुदोष दूर होतात.

रात्री झोपताना उशाजवळ काळ्या कापडात तुरटी बांधून ठेवा. यामुळे वाईट स्वप्ने पडण्यापासून बचाव होतो. घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटीचा तुकडा लटकवा. हे नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखते. तुरटी हा एक चमत्कारिक पदार्थ आहे जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो. याचा वापर करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो, संपत्ती वाढवू शकतो, मानसिक शांती मिळवू शकतो आणि आपले आरोग्य सुधारू शकतो. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? आजच तुरटी वापरा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणा.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....