AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करा करा हे सहा उपाय, घरात होईल सुख समृद्धीचे आगमन

जर तुम्हाला कुंडलीत सूर्यदेवाची शुभ स्थळी नसेल आणि तुम्हाला तुमच्या कामात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय अवश्य करा

सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करा करा हे सहा उपाय, घरात होईल सुख समृद्धीचे आगमन
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 11, 2023 | 10:14 AM
Share

मुंबई : सनातन धर्मात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले गेले आहे. संपूर्ण जग सूर्याने प्रकाशित झाले आहे. वास्तुशास्त्र (Vastu Tips) आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सूर्यदेवाच्या संदर्भात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने मनुष्याला अनेक फायदे मिळू शकतात. या क्रमाने आज आपण सूर्योदय आणि सूर्यास्त जाणून घेणार आहोत, कोणती कामे करावीत आणि कोणती करू नये.

हे सहा उपाय ठरतील फायदेशीर

1. सूर्यास्ताच्या वेळी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कधीही अंधार नसावा. यावेळी सर्वत्र दिवा लावून प्रकाश ठेवावा. असे केल्याने घरात धन-धान्य आणि सुख-समृद्धी टिकून राहते.

2. वास्तुशास्त्रानुसार सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवाला नमस्कार करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद कायम राहतो. मनाला शांती मिळते.

3. सूर्यास्ताच्या वेळी देवघरात नियमितपणे दिवा लावावा. असे केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

4. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्ताच्या वेळी आपल्या पूर्वजांनी नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर दिवा लावावा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

5. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्ताच्या वेळी पलंगावर झोपू नये.  सूर्यास्ताच्या वेळी झोपल्याने किंवा आडवे पडल्याने घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही.

6. धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी घरी परत याल तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत काहीतरी आणलेच पाहिजे. असे केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.

सूर्य उपासनेचा उत्तम उपाय

जर तुम्हाला कुंडलीत सूर्यदेवाची शुभ स्थळी नसेल आणि तुम्हाला तुमच्या कामात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. असेल वेळी शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतील. यावर उपाय म्हणून रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर पूर्ण भक्तिभावाने आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने यश लवकर प्राप्त होते. भगवान सूर्याच्या कृपेनेने जीवनात लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळतात.

सूर्य देवाल प्रसन्न करण्यासाठीचे उपाय

सूर्याची मंगलमयता प्राप्त करण्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी पाण्यातमध्ये लाल फुलं टाकून पूर्व दिशेने सूर्याला अर्घ्य द्यावे. काही कारणास्तव सकाळी सूर्योदयापूर्वी उठता येत नसेल तर सूर्योदयानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षता ठेवून अर्घ्य वाहावे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही गरजू व्यक्तीना गूळ, गहू, लाल वस्त्र, तांबे इत्यादी दान करावे. नेहमी आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांना प्रसन्न ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.