Mangalwar Upay for Finance: मंगळवारच्या दिवशी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ हनुमानाला अर्पण करा, आर्थिक संकट होईल दूर….
Tuesday Hanuman Puja: मंगळवारी हनुमानाचे व्रत केल्याने जीवनात फक्त शुभफळच मिळते. याशिवाय, मंगळ ग्रहाचाही अनुकूल प्रभाव आहे. ज्योतिषशास्त्र मंगळवारी लिंबाचे काही खास उपाय सांगितले आहेत ज्याचा उपयोग तुमच्या आयुष्यासाठी फायदेशीर मानला जातो. चला तर जाणून घेऊया मंगळवारी काय उपाय करणे फायदेशीर ठरेल.

आठवड्यात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. मंगळवारच्या दिवशी हनुमानजींची पूजा केली जाते. मंगळवारच्या दिवशी मंगळ आणि हनुमानजींची पूजा केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व समस्या दूर होतात आणि हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील मंगळाचे प्रभाव कमी होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवारच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरेल.
तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येत असतील आणि महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील तर तुम्ही मंगळवरी हे उपाय नक्की करूनन पाहा. ज्योतिषास्त्रानुसार, मंगळवारच्या दिवशी लिंबाचा वापर करून तुम्ही काही खास उपाय केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो. मंगळवारी या उपायांचे पालन केल्यामुळे सर्व संकट दूर होतात. मंगळवारी हानुमानजींचा आशिर्वाद मिळवण्यासाठी लिबांचे काही खास उपाय करणे फायदेशीर ठरेल.
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करा. यानंतर, मंदिरातच एका लिंबावर 4 लवंगा ठेवा, नंतर हनुमानजींसमोर बसून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करा. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर, पिंपळाच्या झाडाखाली लिंबू आणि लवंग ठेवा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या कामात यश मिळेल. नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर मंगळवारी एक लिंबू घ्या आणि ते तुमच्या डोक्यावर सात वेळा फिरवा आणि नंतर त्याचे दोन तुकडे करा. डाव्या हातात धरलेला लिंबू उजवीकडे फेका आणि उजव्या हातात धरलेला लिंबू डाव्या हाताकडे फेका. असे केल्याने, प्रत्येक कामात नशीब तुमच्यासोबत राहील आणि सर्व प्रकारचे काळे जादू तुमच्यापासून दूर राहतील. जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर मंगळवारी उपवास करा आणि हनुमानजीची पूजा करा. तसेच एक डाग नसलेला लिंबू घ्या आणि रात्री १२ वाजण्यापूर्वी त्याचे चार भाग करा. लिंबाचे चारही भाग चारही दिशांना दूरवर फेकून द्या. असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल.
पैशाशी संबंधित समस्या वारंवार येत राहिल्या तर मंगळवारी उपवास करा आणि हनुमानजींना चोळ अर्पण करा. तसेच, एक लिंबू घ्या आणि चौकाचौकात जा आणि नंतर ते तुमच्या डोक्यावर सात वेळा मारा. यानंतर लिंबू दोन भागांमध्ये कापून घ्या. लिंबाचा एक भाग मागे आणि दुसरा भाग पुढे फेकून द्या आणि मग शांतपणे घरी जा. असे केल्याने हनुमानजींच्या आशीर्वादाने समृद्धीचे दरवाजे उघडतील आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. जर व्यवसाय बराच काळ चांगला चालत नसेल, तर दर मंगळवारी उपवास करा, एक लिंबू घ्या, तो तुमच्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चारही भिंतींना लावा आणि लिंबाचे चार तुकडे करा. नंतर लिंबाचे तुकडे चारही दिशांना फेकून द्या. असे केल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि व्यवसायात नफा मिळू लागेल.