Happy Bhai Dooj 2023 : पाडवा आणि भाऊबीज निमित्त पाठवा मराठी संदेश, व्हाट्सअप स्टेटस
Bhai Dooj or Bhaubeej Wishes, Quotes in Marathi भाऊ-बहिणीचे नाते हे सर्वात सुंदर नाते आहे. या नात्यात कितीही भांडण झाले तरी भाऊ-बहीण आयुष्यभर एकमेकांना साथ देतात. रक्षाबंधनाप्रमाणेच भाऊबीज सणही भाऊ-बहिणीतील अतूट नाते दर्शवतो. यंदा हा सण 14 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. या खास प्रसंगी तुम्ही हे मराठीतील संदेश शेअर करू शकता.
मुंबई : आज दिवाळीचा चौथा दिवस पाडवा आहे. या दिवशी घरातील स्त्री घरच्या ज्येष्ठ पूरूषांना औक्षवण करते. विशेषतः पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला पाडव्या निमित्त भेटवस्तू देतो. पाडव्याचा दुसरा दिवस भाऊबीज (Bhai Dooj) असतो. भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिन भावाला औक्षवण करते. ज्यांना भाऊ नसतो किंवा भाऊ दूर अंतरावर राहातो त्या चंद्राला औक्षवण करतात. आजच्या या सणा निमीत्त तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाढवा तसेच व्हाट्सअप स्टेटस ठेवा.
पाडवा आणि भाऊबीज मराठी संदेश
- नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- वर्षामागून वर्ष जाती,बेत मनीचे तसेच राहती,
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
हे सुद्धा वाचादिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
- पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
दिवाळी पाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
- क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
- बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात… ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
- ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला, “सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ? म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या, आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
- बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे…
सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा!भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव! भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
- सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा
- भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा बंध आहे प्रेम आणि विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा