13 तारखेला जन्माला येणं अशुभ असतं? या दिवशी जन्मलेले लोक वाढदिवस कसा साजरा करतात?
13 तारखेला जन्मणे अशुभ असते या सामान्य गैरसमजावर हा लेख प्रकाश टाकतो. विशेषतः 'शुक्रवार 13 वा' बद्दलच्या अंधश्रद्धांचे खंडन करतो. 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व (हट्टी, महत्वाकांक्षी, नेतृत्व गुण) आणि या गैरसमजामागील वैज्ञानिक तथ्ये यात मांडली आहेत. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, 13 तारखेचा व्यक्तीच्या आयुष्यावर, करिअरवर किंवा यशावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

प्रत्येकाची जन्म तारीख काही तरी सांगत असते. त्या व्यक्तीचं आयुष्य कसं असेल? त्याचं करिअर कसं असेल? त्याच्या आयुष्यात यश येणार की अपयश? या सर्वांवर जन्म तारीख भाष्य करत असते. पण काही जन्म तारखा अशा असतात की लोक गोंधळात पडतात. कारण काही जन्म तारखांना अशुभ मानलं जातं. जसं की 13 ही जन्म तारीख. 13 तारीख अशुभ मानली जाते. त्यात जर ही तारीख शुक्रवारच्या दिवशी आली तर अधिकच अशुभ मानलं जातं. खरोखरच 13 तारखेला जन्म घेणं हे अशुभ संकेत आहेत का? याच्याशी संबंधित तथ्य काय?
लाखो लोकांचे जन्म 13 तारखेला झालेले असतील. पण ही तर मनहूस तारीख आहे, असं अनेकांना ऐकायला आलेलं असेल. त्याला कारणंही आहेत. काही धारणाही यामागे आहेत. पाश्चात्य देशात 13 ही संख्या अनलकी मानली जाते. खासकरून शुक्रवार आणि 13 तारीख एकत्र आली तर ती अधिकच अशुभ समजली जाते. भारतात 13 या आकड्याबाबत नकारात्मक धार्मिक आधार नाहीये. पण समाजात या आकड्यावरून एक मानसिक धारणा झालेली आहे. अनेक लोक घराची संख्या, हॉटेलचा रुम, मजला, लग्नाची तारीखही 13 ठेवत नाहीत. या शिवाय 13 तारखेला जन्मलेले लोक अत्यंत जिद्दी आणि अहंकारी असल्याचं मानलं जातं.
यशासाठी कायपण…
हे लोक यश मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जातात. त्यामुळे ते दुसऱ्यांना नेहमी दुखावत असतात. स्वत:ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांच्यात खूप हाव असते. त्यामुळे ते आपल्या चुकांकडे लक्ष देत नाहीत. पण या तारखेला जन्मलेल्या लोकांमध्ये लीडरशीपची चांगली क्वालिटी असते. त्यामुळे ते लग्झरी लाइफचा आनंद घेतात. पण कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप त्यांना आवडत नाही.
संशोधनही झालंय…
13 तारीख किती अनलकी आहे, हे जाणून घेण्यासाठी ब्रिटिश वैज्ञानिकांनी यावर एक संशोधनही केलं होतं. यात त्यांना महत्त्वाचं तथ्य आढळून आलं. त्यांच्या मते 13 तारखेला जन्माला येणं अशुभ नसतं. त्या तारखेला जर शुक्रवार आला तर तेही अशुभ नसतं. 13 तारीख आणि शुक्रवार याचा व्यक्तीच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही, असं संशोधनात आढळून आलं आहे.
आता या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला नोकरी मिळण्यात अडचणी येतात का? त्यांना कमी पगार मिळतो का? त्यांना असुविधांचा सामना करावा लागतो का? असे सवालही केले गेले. त्यावरही संशोधन झालं. आणि संशोधनात नाही असं उत्तर मिळालं. तारीख आणि या गोष्टींचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. 13 तारखेला जन्मलेले लोक आणि इतर तारखेला जन्मलेल्या लोकांना रोजगारापासून नोकरीपर्यंत आणि शिक्षणापासून पगारापर्यंत सारख्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फार अंतर नाही. त्यामुळे 13 तारीख ही अशुभ असते हेच या संशोधनातून खोडून काढण्यात आलंय. पण तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही लोक तर 13 तारखेला फ्लाईटमधून प्रवासही करत नाहीत. त्यामुळेच एअरलाइन्स कंपन्या 13 तारखेला मोठी सूट देत असतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
