AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : सलग सात बुधवार करा हा उपाय, श्री गणेशाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण

आठवड्यातील बुधवार हा गणपतीला समर्पित असतो. गणरायाची खऱ्या मनाने केलेली उपासना शुभ आणि फलदायी ठरते, असे म्हणतात. कार्यात विघ्न येत असतील तर सलग सात दिवस हे उपाय केल्याने फायदा होतो.

Budhwar Upay : सलग सात बुधवार करा हा उपाय, श्री गणेशाच्या कृपेने होतील सर्व इच्छा पूर्ण
श्री गणेशImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 12, 2023 | 9:27 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मग्रंथांमध्ये, भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले गेले आहे. कोणत्याही शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होते. यामुळे सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. आठवड्यातील बुधवार (Budhwar Upay) हा गणपतीला समर्पित असतो. गणरायाची खऱ्या मनाने केलेली उपासना शुभ आणि फलदायी ठरते, असे म्हणतात. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या कार्यात येणारे अडथळे दूर होतात.  बुधवारी कोणते उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात हे आपण जाणून घेऊया.

सलग सात बुधवार करा हा उपाय

  1. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या आयुष्यातील अडचणी संपण्याचे नाव घेत नसतील आणि तुम्हाला बराच काळ त्रास देत असतील तर बुधवारी मंदिरात जाऊन गणेशजींना शेंदूर अर्पण करा. हा उपाय सलग 7 बुधवार करावा. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे संकटे दूर होतात.
  2. मुलांना अभ्यासात यश मिळवून देण्यासाठी हा उपाय बुधवारी करा. याचे खूप चमत्कारिक परिणाम आहेत आणि ते खूप फायदेशीर सिद्ध होईल. सलग 7 बुधवारी गणपतीला मुगाचे लाडू अर्पण केल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो.
  3. जर तुम्ही दीर्घकाळ आर्थिक संकटातून जात असाल तर 7 बुधवारपर्यंत पांढऱ्या गाईला हिरवे गवत खाऊ घालणे फायदेशीर ठरेल. ज्योतिष शास्त्रानुसार हा उपाय केल्याने घरात धनधान्य आणि धनाची वृद्धी होते. यासोबतच व्यक्तीच्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर 7 बुधवारपर्यंत सतत श्रीगणेशाला गुळ अर्पण करा. असे मानले जाते की व्यक्तीचे अडकलेले काम लवकर पूर्ण होते.
  5. संघर्ष दूर करण्यासाठी सलग 7 बुधवारी गणपतीच्या मंदिरात हिरव्या भाज्या दान करा. यामुळे घरातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी राहते. श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.