AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : बुधवारी केलेल्या या उपायांनी मिळते अनेक त्रासातून मुक्ती, गणरायाची होते कृपा

गणपतीला प्रसन्न करण्यासाठी लोकं बुधवारी उपवास करतात. याशिवाय बुधवार बुध ग्रहाला समर्पित आहे आणि बुधला ग्रहांचा राजकुमार देखील म्हटले जाते.

Budhwar Upay : बुधवारी केलेल्या या उपायांनी मिळते अनेक त्रासातून मुक्ती, गणरायाची होते कृपा
बुधवारचे उपाय Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 21, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस विशीष्ट देवतेला समर्पित आहे त्याच प्रमाणे बुधवारी (Budhwar Upay) प्रथम पूजनीय भगवान गणेशाची पूजा केली जाते. ज्याचे दुसरे नाव विघ्नहर्ता देखील आहे आणि असे म्हटले जाते की गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर करतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी लोकं बुधवारी उपवास करतात. याशिवाय बुधवार बुध ग्रहाला समर्पित आहे आणि बुधला ग्रहांचा राजकुमार देखील म्हटले जाते.  बुध हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, वाणी, त्वचा, सौंदर्य यांचाही कारक आहे असे मानले जाते. कुंडलीत बुध बलवान असेल तर सर्व काही सुरळीत होते आणि बुध कमजोर असेल तर सुख दूर होते असे म्हणतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर बुधवारी काही उपाय करावेत. जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय केल्यास समस्यांपासून सुटका मिळू शकते?

बुधवारचे उपाय

  1. धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी हिरव्या रंगाच्या वस्तू वापरणे शुभ असते आणि जर तुमचा बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवा. तसेच बुधवारी गरजूंना हिरवी मूग डाळ दान करा.
  2. बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो आणि गणेश हा बुद्धी देणारा आहे असे म्हटले जाते. बुधवारी गणेशाला दूब किंवा दुर्वा अर्पण कराव्यात. जर तुम्ही प्रत्येक बुधवारी गणेशजींना 21 दुर्वा अर्पण केल्या तर तुमच्या जीवनात कधीही अडचणी येणार नाहीत आणि गणेशजींचा आशीर्वाद कायम राहील.
  3. जर एखाद्या व्यक्तीला बुध दोष असेल तर त्याने माँ दुर्गेची पूजा करावी. ‘ओम ऐं हरी क्लीं चामुंडयै विचारे’ या मंत्राचा दररोज ५, ७, ११, २१ किंवा १०८ वेळा जप केल्याने बुध दोष दूर होतो.
  4. बुध दोष दूर करण्यासाठी सोन्याचे दागिने घालणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय बुध ग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला लाल रंगाचा ध्वज लावावा.
  5. बुध दोष दूर करण्यासाठी हाताच्या सर्वात लहान बोटात म्हणजे करंगळीमध्ये पन्ना धारण करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र यासाठी पंडित किंवा ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  6. जीवनात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी गाईला गवत खाऊ घालावे. असे म्हटले जाते की, वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाएवढे गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान