रात्री शांत झोप लागत नाही? मनात सारखे विचार येतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितला सोपा उपाय
प्रेमानंद महाराज हे आपल्या प्रवचनासाठी प्रसिद्ध आहेत. ते आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना उपदेश करतात, आपल्या भक्तांच्या समस्यांचं समाधान करतात. प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन ऐकण्यासाठी कायमच भक्त गर्दी करत असतात, त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये शांत झोपेसाठी काही उपाय सांगितले आहेत.

प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना त्यांना एका भक्तानं एक प्रश्न विचारला, महाराज मला रात्री दोन -तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही, मन अशांत आहे, मनात सारखे विचार सुरू असतात, शांत झोपेसाठी काय करू? आपल्या या भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिलं आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या जगात दोन गोष्टी तर त्रिकाल सत्य आहेत, एक म्हणजे संघर्ष आणि दुसरा म्हणजे मृत्यू, संघर्ष तुमची साथ आयुष्यभर सोडत नाही आणि मृत्यू हे तुमच्या आयुष्याचं अंतिम सत्य आहे. त्यामुळे व्यर्थ चिंता का करावी? असा सवाल यावेळी प्रेमानंद महाराज यांनी उपस्थित केला. ते पुढे बोलताना म्हणाले की, तुम्ही व्यर्थ चिंता करू नका, देवावर विश्वास ठेवा, जेव्हा -जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही खूप अति विचार करत आहात, तेव्हा ईश्वराचा नाम जप करा, त्यामुळे तुमची चिंता दूर होईल.
पुढे बोलताना प्रेमानंद महाराज यांनी असं देखील म्हटलं आहे की, जर जप करताना देखील तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मनात विचार सुरूच आहेत, आणि त्यामुळे तुमच्या जपामध्ये, साधनेमध्ये अडथळा निर्माण होत आहे, अशावेळी डोकं शांत ठेवा आणि पुन्हा-पुन्हा प्रयत्न करत रहा असा सल्ला प्रेमानंद महाराज यांनी दिला आहे. जेव्हा तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करता, जप करता तेव्हा आपोआप तुमच्या आसपास असलेली सर्व नकारात्मक शक्ती दूर होते असे प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
तुम्ही जेव्हा झोपण्यासाठी जाता तेव्हा त्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं ईश्वराचं नामस्मरण करा आणि एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की, मानसाच्य आयुष्यात दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे संघर्ष आणि दुसरा म्हणजे मृत्यू. तुम्ही संघर्षाला टाळू शकत नाही. तसेच मृत्यू हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे, त्यामुळे जास्त चिंता करू नका, तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
