Chaitra Navratri 2023: नवरात्रीच्या दिवसात या पाच वस्तूंची खरेदी असते शुभ, कधीच भासत नाही आर्थिक चणचण

नवरात्रीदरम्यान केले जाणारे अनेक उपाय ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत. जे केल्यास तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. यंदाच्या नवरात्रीत करा काही खास गोष्टींची खरेदी.

Chaitra Navratri 2023: नवरात्रीच्या दिवसात या पाच वस्तूंची खरेदी असते शुभ, कधीच भासत नाही आर्थिक चणचण
चैत्र नवरात्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 1:11 PM

मुंबई : आज चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस. 22 मार्चपासून दुर्गा देवीच्या नवरात्रीला (Chaitra Navratri 2023) सुरुवात झाली. हे 9 दिवस माता दुर्गा पूजेचे दिवस आहेत. नवरात्रीच्या दिवसात केलेल्या कामांचे शुभ फळ लवकर मिळतात. हे 9 दिवस शास्त्रात खूप शुभ आणि विशेष मानले गेले आहेत. अशा वेळी जर तुम्हालाही नवरात्रीमध्ये दुर्गेचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तुमचे भाग्य उजळवायचे असेल तर आजच या 5 वस्तू खरेदी करा (Navratri Shopping). यामुळे घरात सकारात्मकतेचे आगमण होते.

नवरात्रीत या 5 गोष्टी घरी आणा

चांदीची भांडी

हिंदू धर्मात चांदीला खूप शुभ मानले गेले आहे. असे म्हणतात की या दिवसात चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. चांदीच्या वस्तूंना समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. नवरात्रीमध्ये चांदीच्या वस्तू घरी आणल्या तर त्या व्यक्तीला आर्थिक बळ मिळते.

मातीचे घर

ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात लहान मातीचे घर खरेदी करून घरात आणणे खूप शुभ मानले जाते. हे घर तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता. हे मातीचे घर देवीजवळ ठेवा आणि त्याची नियमित पूजा केल्यास फायदा होईल. असे म्हणतात की घरात मातीचे घर आणल्याने मालमत्ता खरेदीची शक्यता निर्माण होते आणि पैशाची कमतरता भासत नाही.

हे सुद्धा वाचा

सौभाग्याचं वाण

असे मानले जाते की माता दुर्गेचा आशीर्वाद आणि अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये विवाहित महिलांनी मातेच्या लाल चुणरीसह सौभाग्याच्या वस्तू देखील खरेदी कराव्यात. यामुळे पतीचे वय वाढते आणि महिलांना माता अंबेचा आशीर्वाद मिळतो.

मौली धागा

नवरात्रीच्या दिवसात देखील या गोष्टी खरेदी केल्या पाहिजेत. असे करणे ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जाते. मॉलीच्या धाग्यात नऊ गाठी बांधून माता राणीला अर्पण करा. हा उपाय केल्याने माता भगवती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

देवी लक्ष्मीची प्रतिमा

जर तुमची इच्छा असेल की, घरांमध्ये नेहमी सुख-शांती आणि धन-धान्य सुबत्ता कायम राहावी तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीचा फोटो घरी आणावा आणि देवघरात ठेवावा. हा फोटो घेताना लक्षात ठेवा की, त्यात देवी कमळावर बसलेली आणि तिच्या हातातून धनाची वर्षा होत असावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.