Chanakya Neeti: आचार्य चाणक्य यांच्या मते ‘या’ चार लोकांशी चुकूनही करू नये भांडण

| Updated on: Jul 21, 2022 | 4:58 PM

आचार्य चाणक्य (aacharya chanakya) यांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली चाणाक्य नीती (Chanakya Neeti) आजच्या जीवनातही तितकीच समर्पक आहे. त्यांच्या नीतीचा अवलंब करून आजही उत्तम जीवन जगता येणे शक्य आहे. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये. मात्र अनेकदा इच्छा नसताना […]

Chanakya Neeti: आचार्य चाणक्य यांच्या मते या चार लोकांशी चुकूनही करू नये भांडण
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Follow us on

आचार्य चाणक्य (aacharya chanakya) यांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली चाणाक्य नीती (Chanakya Neeti) आजच्या जीवनातही तितकीच समर्पक आहे. त्यांच्या नीतीचा अवलंब करून आजही उत्तम जीवन जगता येणे शक्य आहे. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये. मात्र अनेकदा इच्छा नसताना आपण वादात ओढले जातो आणि निरर्थक वाद होतो. चाणक्य नीतिमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी वाद घालू नये, याबाबत सांगितलं आहे. या लोकांशी वाद घालणं महागात पडतं, शिवाय त्यांना राग अनावर झाल्यास आपल्या जीवावरही बेतू शकते.

गुपित माहित असलेला व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते, गुपित माहित असलेल्या व्यक्तीसोबत कधीही भांडण करू नये. यामुळे संबंधित व्यक्ती आपलं गुपित उघड करू शकते. विभीषणाला रावणाचे गुपित माहिती होते. त्याने हे गुपित रामाला सांगितलं. त्यामुळे रावण युद्धात मारला गेला.

मूर्ख व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही मूर्ख व्यक्तीसोबत भांडण करू नये. शास्त्रात अशा लोकांशी दोस्ती किंवा शत्रुत्व करू नये, असं सांगितलं आहे. कारण अशा लोकांना चांगलं-वाईट यातला फरक कळत नाही. यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.

हे सुद्धा वाचा

शस्त्र जवळ असलेली व्यक्ती

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असते, अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं. या व्यक्तींशी कधीही भांडण करू नये. कारण रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू शकते. तसेच हातातील शस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला करू शकते.

श्रीमंत व्यक्ती

चाण्यक्य नीतिनुसार श्रीमंत आणि बलवान व्यक्तीशी कधीही भांडण करू नये. कारण अशी व्यक्ती पैसा आणि शक्तिच्या जोरावर आपल्याला हानी  करू शकतो. यासाठी अशा व्यक्तींपासून दूर राहणं आवश्यक आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)