Chanakya Neeti : घरातल्या या 5 गोष्टी कोणालाच सांगू नका, नाहीतर करावा लागेल पश्चताप

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील लोकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Neeti : घरातल्या या 5 गोष्टी कोणालाच सांगू नका, नाहीतर करावा लागेल पश्चताप
| Updated on: Jul 26, 2025 | 10:00 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना प्रेरणा देतात.  आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये व्यक्तीनं आपलं आयुष्य कशापद्धतीनं जगलं पाहिजे, याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात त्या माणसानं आयुष्यात करू नये, अन्यथा त्याच्यावर पश्चताप करण्याची वेळ येऊ शकते. माणसानं पूर्वी ज्या चुका केल्या आहेत, त्यातून बोध घ्यायला हवा, त्याच चुका पून्हा करू नये, त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की, आपल्या घरातील अशा काही गोष्टी असतात ज्या माणसानं बाहेर सांगता कामा नये? यामुळे संसाराचं वाटोळं होऊ शकतं, त्याची तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागू शकते, तुमचं नुकसान होऊ शकतं, त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत? आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या भविष्यकाळासाठी काही योजना तयार करत असाल तर त्याची चर्चा कधीही बाहेर करू नका.

घरातील समस्या – चाणक्य म्हणतात की जर तुमच्या घरात काही समस्या असतील तर त्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा, त्या बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका, कारण त्यामुळे तुमची समस्या सुटणार तर नाहीच उलट वाढण्याचा धोका असतो.

कमाई – चाणक्य म्हणतात तुम्ही किती कमवता, हे कधीच कोणाला सांगू नका, त्यातून तुमचे शत्रू वाढण्याचा धोका असतो.

कर्ज – चाणक्य म्हणतात तुमच्यावर किती कर्ज आहे, याबाबत देखील कुठेही बाहेर चर्चा करू नका, अशा गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात.

पत्नीसोबतचा वाद – चाणक्य म्हणतात जर तुमचा पत्नीसोबत वाद असेल तर ही गोष्ट देखील कोणाला सांगू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)