Chanakya Neeti : काय चुकीचं काय बरोबर काही कळत नाहीये? चाणक्य म्हणतात असा टाळा मनाचा गोंधळ
अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या मनाचा गोंधळ उडतो, काय चांगलं किंवा काय वाईट हे कळत नाही, अशा वेळी नेमकं काय करावं? मनाचा गोंधळ कसा टाळावा? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मार्गदर्शन केलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की अनेकदा माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्याला त्यावेळी काय चुकीचं? काय बरोबर? हे कळत नाही. निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडतो. मनाची द्विधा अवस्था असते. अशा स्थितीमध्ये जर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यास उशिर झाला तर त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. गोष्ट कोणतीही असूद्या माणसानं त्यावर झटपट निर्णय घेतला पाहिजे, तो चुकीचा की बरोबर ते नंतर कळेलच परंतु जर तुम्ही आधीच पराजयाच्या भीतीनं निर्णयच नाही घेतला तर मात्र तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कुठलाही निर्णय घेताना तुमचं मन शांत असणं गरजेचं आहे. निर्णय लवकरात लवकर घेतले गेले पाहिजेत, मात्र ते मन अस्थित असताना घेऊ नयेत असंही चाणक्य म्हणतात. योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत असणं गरजेचं असतं, त्यासाठी काय करावं याबद्दल चाणक्य यांनी सांगितलं आहे.
मन काय सांगतं – चाणक्य म्हणतात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा तुमच्या मनातला आवाज ऐका भलेही जग तुम्हाला काहीही सल्ला देत असेल, पण तुमचं मन काय सांगतं ते पाहा आणि त्यानुसारच पुढचा निर्णय घ्या.
तेच उत्तर खरं – चाणक्य म्हणतात जे उत्तर तुमच्या मनातून येईल तेच उत्तर खरं असणार आहे, त्यानुसार तुम्ही तुमची दिशा ठरवा, निर्णय घ्या. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार कारण तो मार्ग तुम्ही स्वत: निवडलेला असतो. त्यामुळे त्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही दुप्पट मेहनत करता.
तुम्ही काय विचार करता? तुम्ही जसा विचार करता, जसं वागता तीच तुमची समाजामध्ये इमेज बनते. तुम्ही घेतलेला निर्णय जर तुमचे सिद्धांत, आदर्श आणि नैतिकता यापासून फारकत घेणारा असेल तर तो निर्णय चुकीचा आहे अस समजावं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मन खंबीर ठेवा – चाणक्य म्हणतात आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, पण तुम्ही तुमचं मन खंबीर ठेवा, खंबीर मनानं घेतलेले निर्णय सहसा चुकत नाहीत, त्यातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
