Chanakya Neeti : कितीही जवळचे असले तरी या चार लोकांना कधीच पैसे देऊ नका, नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी असे काही लोक सांगीतले आहेत, जे तुमच्या कितीही जवळ असले तरी त्यांना पैसे देऊ नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी त्या काळात संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काही निमय बनवले होते, त्यालाच आपण चाणक्य यांची नीती म्हणून आज ओळखतो, त्यांनी हे सर्व नियम एका पुस्तकामध्ये लिहिले आहेत, ते पुस्तक आज चाणक्य नीती नावाने जगप्रसिद्ध आहे. चाणक्य यांनी ज्या नीती सांगितल्या आहेत, जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना त्यांच्या संकट काळात मार्ग दाखवण्याचं काम करतात. आर्य चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात, जे तुमच्या कितीही जवळचे असले तर देखील त्यांना कधीच उसणे पैसे देऊ नये, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
जे लोक कधीच समाधानी नसतात – चाणक्य म्हणतात अशा लोकांना चुकूनही पैसे देऊ नका, जे लोक कधीच समाधानी होत नाहीत, त्यांना तुम्ही कितीही पैसे द्या, त्यांचं समाधान होणार नाही, तसेच त्यांची गरज पूर्ण झाल्यानंतर असे लोक तुम्हाला कधीच तुमचे पैसे वापस देखील देणार नाहीत, म्हणून अशा लोकांना पैसे देणे टाळावे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चुकीचं काम करणारा व्यक्ती – चाणक्य म्हणतात जे लोक चुकीचं काम करतात, जे कुप्रसिद्ध लोक आहेत, अशा व्यक्तींना तुम्ही कधीही पैसा देऊ नका, कारण अशा व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात.
व्यसनांच्या आहारी गेलेला व्यक्ती – चाणक्य म्हणतात जी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेलेली आहे, अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका, कारण तो जेवढे पैसे कमावतो त्याचा मोठा हिस्सा तो त्याच्या व्यसनांवर खर्च करत असतो, त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतीलच याची कोणतीही गॅरंटी नसते, त्यामुळे अशा व्यक्तींना मदत करताना हजारवेळा विचार करा.
ज्यांना विनाकारण खर्च करण्याची सवय असते – चाणक्य म्हणतात असे लोक काही कारण नसताना देखील आपल्या हातातील पैसा खर्च करतात, त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांना पैसे दिले तर ते परत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे अशा लोकांना पैसे देणं टाळावं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
