Chanakya Neeti : चाणाक्य नितीनुसार अशा घरात लक्ष्मी स्वतः येते चालत, कधीच भासत नाही आर्थिक चणचण

चाणक्याने मानव कल्याणासाठी चाणक्य नीती रचली आहे, ज्यामध्ये ते राजकारण, युद्ध आणि लोकांशी समानता राखण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या नीतिशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक पैलू सखोलपणे मांडले आहेत. चाणक्याची धोरणे आजही प्रासंगिक आहेत.

Chanakya Neeti : चाणाक्य नितीनुसार अशा घरात लक्ष्मी स्वतः येते चालत, कधीच भासत नाही आर्थिक चणचण
चाणाक्य नीतिImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 1:03 PM

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) यांना केवळ पुस्तकी विषयांचाच नव्हे तर जीवनातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही परिस्थितींचा अनुभव होता. जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चाणक्याने मानव कल्याणासाठी चाणक्य नीती रचली आहे, ज्यामध्ये ते राजकारण, युद्ध आणि लोकांशी समानता राखण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्या नीतिशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक पैलू सखोलपणे मांडले आहेत. चाणक्याची धोरणे आजही प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणांमध्ये सद्गुणी व्यक्तीचा तपशीलवार उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, एखाद्या व्यक्तीमध्ये असे काही गुण असतात ज्यामुळे तो यशस्वी होतो आणि अशा लोकांवर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न असते.

अन्नाचा आदर

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, ज्या घरांमध्ये अन्नाचा नेहमी आदर केला जातो, त्या घरांमध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीच्या कृपेने अशा घरांचे भांडार नेहमी भरलेले असतात. ज्या घरांमध्ये अन्नाचा आदर केला जात नाही किंवा अन्न वाया जात नाही अशा घरात माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा कधीच राहत नाहीत.

जेथे ज्ञानी लोकांचा आदर केला जातो

माणसाने नेहमी जाणकार लोकांचा सहवास ठेवावा आणि त्यांचा आदर करावा. आचार्य चाणक्य असेही म्हणतात की माता लक्ष्मी स्वतः त्या घरांना भेट देतात जिथे एखाद्या ज्ञानी व्यक्तीचा आदर केला जातो. जाणकार लोक तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. मुर्ख लोकांमुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

पती-पत्नीमधील समर्पण

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या घरात पती-पत्नी प्रेमाने राहतात आणि एकमेकांचा आदर करतात. अशा घरांमध्ये नेहमी शांततेचे वातावरण असते आणि देवी लक्ष्मी स्वतः तेथे जाते. त्याच वेळी, ज्या घरांमध्ये एकमेकांबद्दल आदर नाही आणि पती-पत्नी प्रत्येक प्रश्नावर भांडत राहतात अशा घरांमध्ये गरिबी असते. त्यामुळे घरात नेहमी शांततेचे वातावरण असावे आणि पती-पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.