Chanakya Neeti : ही वर्ष म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील गोल्डन काळ, त्यावरच पुढचं भविष्य ठरतं
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जो त्याच्यासाठी गोल्डन काळ असतो. जर या संधीचा फायदा करता आला तर त्या व्यक्तीचं भविष्य अत्यंत उज्ज्वल होतं. तो आपलं आयुष्य आरामात जगू शकतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, चाणक्य यांनी ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या नीती केवळ राज्यकारभारापुरत्याच मर्यादीत नाहीयेत, तर त्याचा उपयोग हा आजही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला होताना दिसतो. मानवी जीवनाचा असा एकही पौलू नसेल ज्या विषयावर चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नसेल. चाणक्य हे त्यांच्या काळात जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. पैशांचं नियोजन कशापद्धतीने केलं पाहिजे, हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. चाणक्य यांच्या मते जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर येणारी निम्मी संकटं आपोआप दूर होतात. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही जगातील कोणतीही वस्तू सहज मिळू शकतात, मात्र जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचे नातेवाईक आणि मित्रही तुम्हाला ओळखत नाहीत.
त्यामुळे व्यक्तीने आपल्या आयुष्यात पैशांची बचत ही केलीच पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच व्यक्तीच्या आयुष्यातील कोणता काळ हा गोल्डन काळ असतो? या काळात व्यक्ती आपल्याला हवं ते करू शकतो, हा काळ म्हणजे कोणत्याही व्यक्तीसाठी टर्निंग पॉईंट असतो, असं चाणक्य म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
आर्य चाणक्य म्हणतात प्रत्येक गोष्ट ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकता, जसं की जेव्हा तुमचं शिक्षणाचं वय असतं, तेव्हा तुम्ही अभ्यासच केला पाहिजे, इतर गोष्टी करता कामा नये, जर तुम्ही योग्य वेळेत चांगला अभ्यास केला, उत्तम शिक्षण घेतलं तर भविष्यात तुम्हाला चांगला रोजगार मिळतो आणि तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदात व्यतीत करू शकता. मात्र तेच जर तुम्ही शिक्षण घेण्याच्या वयात अभ्यास केला नाही तर मात्र तुम्हाला भविष्यात अनेक संकट येऊ शकतात.
चाणक्य पुढे म्हणतात की वय वर्ष 6 ते 32 हा कोणत्याही व्यक्तीचा गोल्डन काळ असतो, हा काळा असा असतो की या काळात व्यक्ती आपल्या जीवनाला हवं तसं वळण देऊ शकतो. तो जे ठरवतो ते स्वप्न साकार करण्याचा हा काळ असतो, त्यामुळे या काळात माणसानं प्रचंड कष्ट करावेत,या काळात व्यक्ती ज्या गोष्टी शिकतो त्याच गोष्टी त्याच्यासाठी भविष्यातील त्याची गुंतवणूक असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
