AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मित्र, नातेवाईकांना उसणे पैसे देताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नात्यात येईल कटुता

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या चाणक्य नीतीमध्ये चाणक्य पैशांचं महत्त्व सांगताना म्हणतात की पैसा ही या जगातील सर्वात शक्तिशाली वस्तू आहे. तुम्ही त्याचा उपयोग कसा करता, त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं.

Chanakya Niti : मित्र, नातेवाईकांना उसणे पैसे देताना नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नात्यात येईल कटुता
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 8:22 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार थोडक्यात सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात पैसा ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. त्यामुळे पैशांचा वापर हा नेहमी काळजीपूर्वकच केला पाहिजे. तुम्ही तुमच्या हातात असलेल्या पैशांचा वापर कसा करता? यावर तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. चाणक्य म्हणतात माणूस पैसे कमावण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. तो पैसे कमावतो, परंतु आयुष्यात असे काही प्रसंग येतात की तेव्हा आपल्या खूप जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकांना पैशांच्या मदतीची गरज असते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु तरी देखील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे देताना काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे, अन्यथा तुमच्या नात्यात कटुता येऊ शकते, तुमचे नातेसंबंध दुरावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही पैसे देता, तेव्हा काही गोष्टी या लक्षात ठेवल्याच पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पैसे विसरून जा – चाणक्य म्हणतात जर तुमच्याकडे तुमच्या गरजेपेक्षा खूप जास्त पैसे आहेत, आणि अशावेळी एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैशांची मदत केली तर तुम्ही त्याला पैसे दिले होते, ही गोष्ट विसरून जा, कारण तुमच्या पैशांमुळे त्या व्यक्तीचं भलं होणार आहे, परंतु जर ते पैसे त्या व्यक्तीने वापस दिले नाहीत तर तुम्हाला जर फार काही फरक पडणार नसेल तर अशा व्यक्तींकडे वारंवार पैशांसाठी तगदा लावू नका, त्यामुळे तुमचे नातेसंबंध खराब होऊ शकतात, त्यामुळे आपण त्याला मदत केली होती, ही गोष्टी तुम्ही अशावेळी विसरून जा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

इतर वादात पैसे आणू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैशांची मदत केली, मात्र त्या व्यक्तीसोबत तुमचा दुसऱ्या कारणावरून वाद झाला, तर अशावेळी तुम्ही केलेली मदत किंवा दिलेल्या पैशांची त्या व्यक्तीला वारंवार आठवण करून देऊ नका, कारण यामुळे तुमच्या नात्यात कटूता येऊ शकते.

व्यवहारांची तारीख लक्षात ठेवा – तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते तुम्ही त्याला कधी दिले आहेत, आणि तो तुम्हाला परत कधी करणार आहेत, या दोन तारखा लक्षात ठेवा असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने