AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या लोकांचा नेहमी आदर करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, चाणक्य म्हणतात..

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात आपल्या आयुष्यात अशी काही लोक असतात, त्यांचा आपण कायम आदर केला पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या लोकांचा नेहमी आदर करा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, चाणक्य म्हणतात..
Chanakya NitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 7:51 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शन करतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आदर्श जीवन कसं जागावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशी काही लोक येतात ज्यामुळे त्यांचं अख्खं आयुष्यच बदलून जातं. जर तुमच्या आयुष्यात चांगले लोक आले, तर त्यांच्या सहवासामध्ये तुमचं आयुष्य अधिक चांगलं होतं, तुमच्या जगण्याला नवा अर्थ मिळतो. परंतु जर तुमच्या आयुष्यात चुकीचे लोकं आले, तर मात्र तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जी चांगली लोकं येतात, जे तुमचे मार्गदर्शक असतात. ज्या लोकांमुळे तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. अशा लोकांचा तुम्ही कायम आदरच केला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आई-वडील – चाणक्य म्हणतात या जगात जर खरोखर तुमचं कोणी शुभ चिंतीत असेल तर ते म्हणजे तुमचे आई-वडील. संपूर्ण जग एकीकडे असतं आणि तुमचे आई-वडील एकीकडे असतात. आज तुम्ही जेपण आहात ते तुमच्या आई-वडीलांमुळेच आहात. आई-वडील हे आपल्या मुलांची जडणघडण चांगली व्हावी यासाठी प्रचंड कष्ट करतात. त्यामुळे आई-वडिलांचा आदर करणं हे तुमचं कर्तव्य आहे. ज्या घरात आई-वडिलांची सेवा होते. त्यांना मान दिला जातो. त्या घरात कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षक – चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुमच्या आई-वडिलांनंतर जर सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असेल तर ते म्हणजे तुमचे शिक्षक. कारण तुमचे शिक्षक हे तुमचं संपूर्ण आयुष्य घडवतात. शिक्षक तुम्हाला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची ताकद देतात. तुमच्या आई-वडिलांनंतर तुमच्या शिक्षकाचा तुमच्या जडण घडणीमध्ये सर्वात मोठा वाटा असतो, त्यामुळे शिक्षकांचा नेहमी आदर केला पाहिजे, असं चाणक्य म्हणतात.

पती-पत्नी – चाणक्य म्हणतात आई-वडील, शिक्षक यानंतर आपण नेहमी आपल्या जोडीदाराचा तुम्ही पती असाल तर आपल्या पत्नीचा किंवा पत्नी असाल तर आपल्या पतीचा आदर केलाच पाहिजे. तरच संसार हा दीर्घकाळ टिकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे