Chanakya Niti : या दोन गोष्टी मानसाला बरबाद करतात, येते पश्चतापाची वेळ
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे जर माणसानं लक्ष दिलं नाही तर त्याच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा एक असा ग्रंथ आहे, जो केवळ वाचण्यासाठी नाही, तर त्यावर विचार कण्यासाठी आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टी एखाद्या व्यक्तीने आपल्या आचरणात आणल्या तर नक्कीच त्याचं आयुष्य सुखाचं होऊ शकतं, त्याचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळेच चाणक्य यांनी त्या काळात ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही लागू होतात, आजही हे विचार अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात.
चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही चुका सांगितल्या आहेत, त्या चुका आयुष्यात तुम्ही कधीच करू नका असा सल्ला चाणक्य देतात. अनेक चुका अशा असतात ज्या केल्यास तुम्हाला तुमची चूक सुधरण्याची आणखी एक संधी मिळू शकते, मात्र काही अशा चुका असतात ज्या मानवानं केल्या तर त्याच्यावर पश्चतापाची वेळ येते. चल तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
अज्ञान – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे शिक्षण. शिक्षणानं माणूस मोठा होता. शिक्षणात माणूस बदलण्याची ताकत आहे. शिक्षण ही तुमची जन्मभराची कमाई असते. त्याच शिक्षणाच्या जोरावर तुमच्या आयुष्याच्या इमारतीचा डोलारा उभा राहणार असतो, मात्र तुम्ही शिक्षण न घेण्याची चूक केली, अज्ञानी राहिलात तर ही चूक आयुष्यात तुम्हाला सर्वात भारी पडते, ही संधी पुन्हा येत नाही आणि तुम्हाला पश्चताप करावा लागतो.
मित्रांची संगत – चाणक्य म्हणतात जसं आयुष्यात शिक्षण महत्त्वाचं आहे, तसेच आयुष्यात संगत देखील महत्त्वाची आहे, लक्षात घ्या चांगली संगत तुम्हाला यशाच्या अशा उंचीवर नेऊन बसवते जिथपर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही, मात्र तुम्हाला जर चुकीची संगत असेल तर मात्र तुम्ही बरबाद होतात, त्यामुळे तुमचे मित्र नक्की कोण आहेत? याकडे लक्ष द्या, असा सल्ला चाणक्य देतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
