Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘असे’ लोक कधीच धनवान बनत नाहीत, खिसा राहातो रिकामा
चाणक्य हे महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ, राजनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विविध विषयांवर चर्चा केली आहे. ज्यामध्ये व्यक्तीनं आयुष्य जगताना काय करावं? काय करू नये? कोणत्या चुका टाळाव्यात? आदर्श पती कोणाला म्हणावं? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? मुलगा आणि आई-वडिलांचं नातं कसं असावं? खरा मित्र कसा ओळखावा? शत्रू कोणाला म्हणावं? स्वार्थी लोक कसे ओळखावेत असे एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये माडले आहेत.
चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये असे काही गुण सांगितले आहेत, ते जर व्यक्तीत असतील तर तो व्यक्ती कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, असं चाणक्य म्हणतात. जर व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल, तो जर जुगार खेळत असेल, परस्त्रीचा नाद असेल तर असा व्यक्ती आयुष्यभर कंगाल राहातो, त्यामुळे या सवयी असता कामा नये असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आर्य चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला कुठलंही व्यसन असेल समजा तो जर दारू पित असेल तर असा व्यक्ती आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा हा त्या व्यसनावर खर्च करतो, त्यामुळे तो आपल्या आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. त्यामुळे व्यक्तींनी व्यसन करता कामा नये,
पुढे चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला जुगार खेळण्याचा नाद असेल तर असा व्यक्ती बरबाद होतो. कारण आपन किती पैसा खर्च करतो याचं भाव जुगाराच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला नसतं, त्यामुळे असा व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.
चाणक्य म्हणतात जो व्यक्ती आपली बायको सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, किंवा तिला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो असा व्यक्ती देखील श्रीमंत होऊ शकत नाही, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या गोष्टींचा त्याग करावा असा सल्ला चाणक्य देतात.
