Chanakya Niti : या तीन लोकांना चुकूनही करू नका मदत, अडचणीत याल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी असे तीन लोक सांगितले आहेत, ज्यांची मदत जर तुम्ही केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांना मदत न करण्याचा सल्ला चाणक्य देतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मानवाला आपलं आयुष्य जगत असताना उपयोगाच्या ठरतात. व्यक्तीनं काय करावं आणि काय करू नये? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ तर होतेच, मात्र ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यामुळे तुमचा व्यवहार कोणासोबत कसा असावा? आणि आपलं काम कसं साध्य सरून घ्यावं? याबाबत देखील अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
दरम्यान चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सल्ला कोणाला द्यावा? सल्ला कोणाला देऊ नये? मदत कोणाची करावी? मदत कोणाची करू नये? याबाबत देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, ज्यांची तुम्ही चुकूनही मदत करू नका, तुम्ही जर त्यांची मदत केली तर तुम्हीच अडचणीत याल. कोण आहेत ती लोक? आणि आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
मुर्ख व्यक्तीची मदत करू नका – आर्य चाणक्य म्हणतात चुकूनही मूर्ख व्यक्तीची मदत करू नका, किंवा त्याला सल्ला देऊ नका, कारण मूर्ख व्यक्तीला सल्ला देणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असतं, तुम्ही त्यावर कितीही पाणी टाका पाणी घड्यात शिरणार नाही, मात्र पाणी वाया जाईल. तसंच मुर्खांचं देखील असंत, तुम्ही त्यांना कितीही मदत करा ते सुधारणार नाहीत, या उलट तुमची मदत वाया जाईल, त्यामुळे तुमचे नुकसान होईल, त्यामुळे मुख्य माणसाला मदत न करण्यातच तुमचं हीत आहे.
उपकाराची जाण नसलेल्या व्यक्तींची मदत करू नका – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव नाही, अशा व्यक्तीची कधीही मदत करू नका, कारण असा व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो.
अशी मदत करू नका ज्यामुळे तुम्ही अडचणीत याल – चाणक्य म्हणतात समोरचा व्यक्ती कोणीही असो, त्याला अशी मदत कधीच करू नका, ज्यामुळे तुम्ही अडचणीत याल.
