AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी माणसाच्या अशा काही सवीय सांगितल्या आहेत, त्या जर तुम्हाला असतील तर कधीही आयुष्यात आर्थिक समस्या येत नाही.

Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
cahankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात की ज्यांच्याजवळ एकही रुपया नसते, मात्र त्यांच्या वृद्धापकाळात असे लोक प्रचंड श्रीमंत होतात, तर दुसरीकडे असे देखील काही लोक असतात, ज्यांच्याकडे त्यांच्या तरुणपणात अफाट संपत्ती असते, मात्र वृद्धापकाळात त्यांच्याकडे एकही रुपया राहत नाही, तर हे असं का होतं तर पैशांचं योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे माणसावर हे संकट ओढावतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, काही अशा सवयी असतात ज्या जर माणसाने आत्मसात केल्या तर त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही.

पैशांची बचत – चाणक्य म्हणतात माणसानं आपल्या आयुष्यात पैशांची बतत ही केलीच पाहिजे. कारण जर तुमच्याकडे पैसे असतील तर आणि तरच समाजात तुम्हाला किंमत मिळते, अन्यथा तुमच्या घरचे देखील तुम्हाला विचारत नाहीत, त्यामुळे तुम्ही जर 100 रुपये कमावत असाल तर त्यातील 25 रुपये तुम्ही बचत केली पाहिजे.

आर्थिक शिस्त- चाणक्य म्हणतात माणसासाठी आर्थिक शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. जर माणसाला आर्थिक शिस्त नसेल तर तुम्ही पैशांची बचत करू शकत नाहीत. कुठे पैसा खर्च करायचा आणि कुठे करायचा नाही, याचं ज्ञान माणसाला हवं, तसेच निरर्थक ठिकाणी पैसे खर्च करण्याची सवय माणसाला असू नये.

पैशांचं गणित – चाणक्य म्हणतात माणसाने पैशांचा हिशोब चोख ठेवला पाहिजे, आपल्याकडे सध्या किती पैसे आहेत? किती खर्च होणार आहेत? आपल्याकडे किती शिल्लक आहेत, याचं गणित माणसाला जमलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा