AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | उत्तम आरोग्य, यश आणि पैसा हवा असेल तर, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर आचार्य चाणक्यांनी दिलेल्या धोरणांचे अवश्य पालन करा. यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

Chanakya Niti | उत्तम आरोग्य, यश आणि पैसा हवा असेल तर, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा
chankaya niti
| Updated on: Feb 01, 2022 | 7:55 AM
Share

मुंबई:  आचार्य चाणक्य यांची धोरणे आपण वाचतो आणि ऐकतो (Acharya Chanakya), परंतु त्यांचे पालन करत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं असते ते नाही, उलट आपण ज्याचा विचारही करत नाही ते घडतं. आयुष्यात हवं ते मिळावायचं असेल तर काय करावं हे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये (Chankaya Niti) सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते यश मिळविणे सोपे काम नाही. जीवनात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम (Hard Work) आणि त्याग करावा लागतो. जर तुम्हाला उत्तम आरोग्य, यश आणि पैसा हवा असेल तर आचार्य चाणक्यांनी दिलेल्या धोरणांचे अवश्य पालन करा. यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात आचार्य चाणक्य यांच्यानुसार, यश मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत-

1-शिस्त चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम आपण शिस्तबद्ध बनले पाहिजे. ज्या व्यक्तील वेळेचे महत्त्व असते. यश त्यामाणसाचे असते.यामुळेच प्रत्येकाने शिस्तीची भावना अंगीकारण्याचा आग्रह धरला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करता तेव्हा त्या गोष्टी पूर्ण होतात.

2-ज्ञान चाणक्य नीतीनुसार, यश मिळवण्यात ज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. जो माणूस ज्ञानाने कमकुवत असतो, त्याला यश सहजासहजी मिळत नाही आणि त्याला संघर्ष करावा लागतो, तर जे ज्ञान मिळविण्यासाठी सदैव तत्पर असतात, त्यांना सहज यशाची चव चाखायला मिळते. यामुळेच अशा लोकांना लक्ष्मीची कृपा असते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण काहीतरी शिकत राहायला हवे. शिकल्यामुळेच तुम्हाला जास्त पर्याय निर्माण होतात. त्यामुळे कायम काहीतरी शिकत राहा.

3- कठोर परिश्रम चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की यशामध्ये कठोर परिश्रमाचाही विशेष वाटा असतो. मेहनतीशिवाय यश मिळू शकत नाही. जे कष्ट करायला घाबरतात, त्यांना यशाचा आनंद मिळत नाही. कारण कष्ट न करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मेहनतीमध्ये न घाबरता आळस सोडून त्यात गुंतून राहा, यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. या गोष्टी आत्मसात केल्यावर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही यश तुमचेच असेल.

4 अस्वच्छता देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. जे लोक अस्वच्छ राहतात त्यांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. माणसाने भौतिक, शरीर आणि मनाची शुद्धता करणे गरजेचे असते. त्यामुळे घर आणि शरीराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. उत्तम आरोग्य, यश आणि पैसा हवा असेल तर घर स्वच्छ ठेवा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच

Vastu Tips | घरात या ठिकाणी बसून जेवण केल्यास फटका बसणार, दारिद्र्याच्या दिशेनं वाटचाल ठरलेली!

Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.