Chanakya Niti : स्वत:मध्ये करा हे बदल, चाणक्य म्हणतात आयुष्यात पुन्हा तुम्हाला कोणी कधी फसवणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य म्हणतात या जगात अशी काही माणसं असतात, ज्यांची नेहमी फसवणूक होते. यासाठी त्यांचा स्वभाव कारणीभूत असतो, मात्र अशा लोकांनी आपल्यामध्ये काही आवश्यक बदल केले तर अशा लोकांना पुन्हा कधीच कोणी फसवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या जगात अशी काही माणसं असतात ज्यांची कायम फसवणूक होते. याचं कारण अशा लोकांच्या स्वभावामध्ये दडलेलं असतं. जे लोक स्वभावाने साधे-भोळे असतात, अशाच लोकांची समाजात नेहमी फसवणूक होते. त्यामुळे माणसाचा स्वभाव हा कधीही भोळा नसावा, दयाळू असावा परंतु भोळा कधीच असू नये. माणसाने नेहमी आपल्या आसपास काय गोष्टी घडत आहेत? याची माहिती ठेवली पाहिजे. समोरचा व्यक्ती आपल्यासोबत नेमका कसा व्यवहार करत आहे? हे आपल्या वेळीच लक्षात आलं पाहिजे. जर या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तो जसा तुमच्यासोबत व्यवहार करत आहे, तसाच व्यवहार तुम्ही देखील त्याच्यासोबत कराल हे अपेक्षित असतं. त्यामुळे समोरचा माणूस तुम्हाला फसवताना हजारवेळा विचारल करेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची फसवणूक होऊ नये, यासाठी तुमच्या स्वभावात काही बदल गरजेचे आहेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
साधा सरळ स्वभाव – चाणक्य म्हणतात माणसाचा स्वभाव हा कधीच साधा सरळ असू नये, यामुळे लोक तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात. तुमच्याकडून आपलं काम करून घेतात. मात्र जेव्हा तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज असते, तेव्हा मात्र हे लोक तुमच्यापासून दूर निघून जातात. अशा गोष्टी टाळण्यासाठी तुमचा स्वभाव हा साधा सरळ नसावा. तुम्ही कोणाबद्दलही तुमच्या मनात आकस ठेवू नका, परंतु तुमची फसवणूक कोण करत आहे, ते लक्षात घेऊन त्याला जशास तसं उत्तर द्या, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्पष्टपणे नकार द्यायला शिका – जर तुम्हाला एखादी गोष्ट शक्य नसेल किंवा त्यामुळे जर तुमचं नुकसान होणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कधीही लोकांच्या दबावाला बळी पडू नका, अशा स्थितीमध्ये स्पष्टपणे नकार द्यायला शिका, यामुळे तुमचं मोठं नुकसान टळेल, असं चाणक्य म्हणतात.
कमी बोला – चाणक्य म्हणतात आयुष्यात कमी बोला अन् जास्ती जास्त ऐका यामुळे एक फायदा होईल तो म्हणजे या जगात काय चाललं आहे? याची कल्पना तुम्हाला येईल, त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करू शकाल. परंतु तुम्ही जर जास्त बोलत असाल तर त्यामुळे तुमची गुपीतं समाजाला कळतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
