Chanakya Niti : या तीन गोष्टीला कधीच घाबरू नका, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यांना कधीच घाबरलं नाही पाहिजे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील काळाच्या सुसंगत वाटतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतात. परंतु त्याला कधीच घाबरायचं नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतीही वेळ कायम स्वरुपी राहत नसते. वेळ ही बदत असते. उन्हाळ्यानंतर पावसाळा येणारच असतो. त्यामुळे कठीण प्रसंगात कधीही खचून जायचं नाही. तुम्ही खचलात की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकणार नाही. प्रत्येक प्रसंगाला मोठ्या धिराने सामोरं गेला पाहिजे, आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, त्यांना कधीही घाबरू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जबाबदारी – चाणक्य म्हणतात आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर तुमच्यावर जबाबदारी ही येतच असते. ती जबाबदारी स्विकारायची असते, तिच्यापासून पळ काढायचा नसतो. जे लोक जबाबदारी स्विकारतात ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. परंतु जे लोक जबाबदारी स्विकारत नाहीत, अशा लोकांना पराभवाचा सामना करावा लागतो.
सत्य -चाणक्य म्हणतात या जगात सत्य हे शाश्वत आहे. त्यामुळे सत्याचा नेहमी सामना करायचा. तुम्ही सत्यापासून कितीही पळ काढला तरी सत्य हे तुमचा पाठलाग करणारच. त्यामुळे कधीही सत्यापासून दूर जाऊ नका, सत्याचा स्विकार करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे कष्टापासून कधीही दूर जाऊ नका, कष्ट करा त्यामध्ये तुमचं हीत आहे. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढं अधिक यश तुम्हाला मिळेल, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
