Chanakya Niti : अशा लोकांकडून कधीच अपेक्षा ठेवू नका, चाणक्य काय म्हणतात?
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात, त्यांच्याकडून तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपलं जीवन कसं जगावं? आयुष्यात कोणत्या चुका कधीच करू नये, कोणावर विश्वास ठेवावा? कोणावर विश्वास ठेवू नये, अशा एक न अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार थोडक्यात सांगितलं आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. चाणक्य म्हणतात समाजात अशी काही माणसं असतात, ज्यांच्यावर कधीही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. तुम्ही जर अशा लोकांवर विश्वास ठेवलात तर तुमचा फार मोठा विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहावं. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, मात्र शेवटी आपल्याला आयुष्यात धोकाच मिळतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवता कामा नये, तसेच अशा लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
पोकळ सहानुभूती असलेले लोक – चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात. जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचं दाखवतात. ते तुमच्याशी खूप प्रेमाने वागतात. मात्र मनातून कायम तुमच्याबद्दल वाईट चिंतीत असतात. जेव्हा तुमचं नुकसान करण्याची संधी येते, तेव्हा हेच लोक सर्वात पुढे असतात. असे लोक हे उघड शत्रू पेक्षा खूप खतरनाक असतात, कारण आपला शत्रू कोण हे आपल्याला माहिती असल्यामुळे आपण त्याच्यापासून सावध राहतो, त्यामुळे आपलं नुकसान होत नाही. मात्र जे पोकळ सहानुभूती दाखवणारे लोक असतात. ते आपल्याला वरून आपले मित्र वाटतात. मात्र तेच आपल्या वाईटावर टपलेले असतात. त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखून त्यांच्याकडून कधीही मदतीची अपेक्षा ठेवू नका. कारण असे लोक फक्त मदतीचं नाटक करतात. त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो.
स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, अशा लोकांकडून कधीही मदतीची अपेक्षा ठेवू नये. कारण असे लोक जिथे संधी मिळेल तिथे त्यांचा स्वार्थ साधत असतात. अशा लोकांना तुमच्या मैत्रीमध्ये स्वत:चा स्वार्थ दिसतो, म्हणून ते तुमच्याशी मैत्री करतात. त्यामुळे अशा लोकांकडून निस्वार्थ भावनेनं मदतीची अपेक्षा कधीही केली जाऊ शकत नाही.
मदतीच्या बदल्यात अपेक्षा – चाणक्य म्हणतात जे लोक मदतीच्या बदल्यात तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात, अशा लोकांकडून तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नका, कारण असे लोक तुम्हाला कधीच निस्वार्थ भावनेनं मदत करणार नाहीत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
