AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Raj Thackeray : ठाकरेंसोबत युती झाली पण... मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?

MNS Raj Thackeray : ठाकरेंसोबत युती झाली पण… मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?

| Updated on: Jan 01, 2026 | 4:29 PM
Share

राज ठाकरे यांनी मुंबईतील ५३ मनसे उमेदवारांना मार्गदर्शन केले. पैशाच्या आमिषांना बळी न पडता मुंबई वाचवण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच, प्रत्येक बूथवर १० माणसे उभी करून बोगस मतदान रोखण्याचे कडक आदेश दिले. मुंबई मराठी माणसांची असून ही शेवटची संधी असल्याचेही ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या ५३ उमेदवारांची नुकतीच भेट घेतली. शिवतीर्थावर झालेल्या या भेटीत राज ठाकरे यांनी उमेदवारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तुम्हाला पैशाच्या अनेक ऑफर येतील, परंतु कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. “पैसे दिले तरी बळी जाऊ नका, मुंबई वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसांची आहे आणि ही आपल्याकडे शेवटची संधी आहे,” अशा शब्दांत त्यांनी उमेदवारांना कानमंत्र दिला. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर १० माणसे उभी करून बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. जर एखादा बोगस मतदार आढळल्यास त्याला जागेवरच फटकारून काढण्यासही राज ठाकरे यांनी सांगितले. या मार्गदर्शनानंतर सर्व उमेदवार प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Published on: Jan 01, 2026 04:29 PM