Chanakya Niti : या लोकांच्या मध्ये कधीच पडू नका, अन्यथा संकटात सापडाल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात की आपण त्यांच्या कामात कधीच हस्तक्षेप करू नये, त्यामुळे आपण आणि तो व्यक्ती दोघेही अडचणीत येऊ शकतो.

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याच थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर चाणक्य हे आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात असे काही लोक असतात ज्यांना तुम्ही जर झोपेतून जागं केलं तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा जंगलात फिरण्यासाठी गेलात तर सिंह झोपलेला असेल तर त्याला कधीही जाग करू नका, तो जागा झाला तर तुमची शिकार करणार. तुमचा मृत्यू निश्चित आहे, तसेच पुढे चाणक्य म्हणतात राजाच्या झोपेमध्ये देखील कधी व्यत्यय आणू नका, जर राजाची झोप मोड झाली तर त्याचा प्रकोप होऊ शकतो आणि तो तुम्हाला मृत्यूदंड देखील देऊ शकतो. त्याच प्रमाणे चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये हे देखील सांगितलं आहे की, या जगात अशी काही लोक असतात, त्यांच्या कामात तुम्ही कधीही व्यत्यय आणू नका, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
नोकर आणि मालक – चाणक्य म्हणतात जेव्हा नोकर आणि मालकाचं बोलणं सुरू असतं, तेव्हा तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीने कधीही त्यामध्ये हस्तक्षेप किंवा मध्यस्थी करू नये, कारण ती त्यांची वैयक्तिक बाब आहे, जर तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप केला तर पैशांची गुंतागुंत वाढू शकते. तसेच अशा ठिकाणी तुमचा अपमान देखील होण्याची शक्यता असते, त्यामुळे कधीही जेव्हा नोकर आणि मालक बोलत आहेत, अशा ठिकाणी तुम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका.
दोन विद्वानांमधील संभाषण – चाणक्य म्हणतात जेव्हा दोन विद्वानांचं संभाषण सुरू असतं, तेव्हा मध्ये बोलण्याची चूक करू नये, कारण ते दोघेही त्या विषयातील तज्ज्ञ असतात, अशावेळी आपण जर मध्ये बोललो तर आपला अपमान होऊ शकतो. कारण आपल्याला त्या विषयाची पुरेशी माहिती नसताना देखील आपण बोलण्याची चूक करत असतो, अशावेळी मध्ये न पडणं हेच आपल्या हिताचं असतं असं चाणक्य म्हणतात.
भांडणं – चाणक्य म्हणतात जेव्हा दोन व्यक्तींची भांडणं सुरू असतात, तेव्हा त्या भांडणाच्या मध्ये पडू नये, कारण अनेकदा त्यामुळे तुम्हाला देखील इजा होण्याची शक्यता असते, तसेच तुम्ही जर मध्यस्थी केली तर तुमचा देखील शत्रू तयार होऊ शकतो, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
