AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन ठिकाणांहून निघताना कधीच मागे वळून बघू नका, त्यातच तुमचं हीत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंंथ लिहिला या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं आहे की, या जगात असे तीन ठिकाणं आहेत, ते सोडल्यानंतर कधीही मागे वळून पाहू नका.

Chanakya Niti : या तीन ठिकाणांहून निघताना कधीच मागे वळून बघू नका, त्यातच तुमचं हीत
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 12, 2026 | 9:46 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात समाजात असे तीन ठिकाणं आहे, या ठिकाणांहून तुम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला लागतात, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नये, त्यातच तुमचं हीत आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

एखाद्या व्यक्तीला पैसे उधार दिल्यानंतर किंवा त्याची मदत केल्यानंतर – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करतात किंवा त्याला पैसे उधार देतात, अशा वेळी जेव्हा तुम्ही त्याचं घर सोडता, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला निस्वार्थ भावनेतून मदत केलेली असते. परंतु तुम्ही जेव्हा मागे वळून पहाता, तेव्हा अशावेळी त्या व्यक्तीच्या मनात देखील तुमच्या मदतीबद्दल संकोच निर्माण होतो आणि तुमच्या मनात देखील अभिमान निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशावेळी कधीही मागे वळून पाहून नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कोर्ट कचेरी किंवा एखाद्या वादग्रस्त जागेतून बाहेर पडल्यानंतर – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या कोर्ट कचेरीच्या ठिकाणावरून बाहेर पडतात तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, जेव्हा तुम्ही अशा ठिकाणाकडे पुन्हा वळून पहाता याचा अर्थ तुम्ही अजूनही मानसिकरित्या तिथेच अडकलेले आहात असा त्याचा अर्थ होतो.

कपटी व्यक्तीच्या घरातून बाहेर पडताना – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या कपटी व्यक्तीच्या घरातून बाहेर पडता, तेव्हा कधीही मागे वळून पाहू नका, तसेच त्याच्या घरी देखील पुन्हा कधी जाऊ नका, त्यातच तुमचं हीत आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?