Chanakya Niti : घरातील या 3 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर येईल पश्चतापाची वेळ

आपल्या कुटुंबात अशा काही घटना घडत असतात, ज्या कुटुंबांच्या बाहेर कळता कामा नये, यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Chanakya Niti : घरातील या 3 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर येईल पश्चतापाची वेळ
| Updated on: Jul 24, 2025 | 1:18 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याबाबत अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहे, आयुष्य जगताना काय टाळावं? कोणत्या चुका करू नये? कोणती कार्य करावीत? याबाबत चाणक्य यांनी आपला ग्रंथ चाणक्य नीतीमध्ये मार्गदर्शन केलं आहे.

आदर्श व्यक्ती कोणाला म्हणावं, त्याची लक्षणं काय असतात? आदर्श राजा कसा असावा? माणसाने कोणाला उपदेश करावा? कोणाला उपदेश करू नये? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? कसं ओळखावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पतीची लक्षणं काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन चाणक्य नीती या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे.

आर्य चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की काही अशा गोष्टी असतात, ज्या चुकूनही कोणाला सांगू नये, चाणक्य म्हणतात आपल्या कुटुंबात घरात अशा काही गोष्टी घडतात ज्याबद्दल तुम्ही इतरांना सांगणं टाळलं पाहिजे, या गोष्टी तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला सांगितल्या तर तो त्याचा फायदा घेऊ शकतो, यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं, अशा कोणत्या गोष्टी आहेत? आणि चाणक्य काय म्हणतात?  याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पती-पत्नीमधील भांडणं- चाणक्य म्हणतात पती -पत्नीमधील भांडणं हे त्यांनी त्यांच्या पातळीवर सोडवणं गरजेचं आहे, ही गोष्ट तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला कळता कामा नये, कारण यामुळे तिसरा व्यक्ती या संधीचा फायदा घेऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या संसाराचं वाटोळ होऊ शकतो.

कुटुंबातील योजना – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही आणि तुमचं कुटुंब मिळून भविष्यासाठी एखादी नवी योजना तयार करत असाल तर ती चुकूनही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका, यामुळे तुमंच नुकसान होऊ शकतं.

घरातील धन संपत्तीची माहिती – चाणक्य म्हणतात तुम्ही किती पैसे कमवता? तुमच्यकडे  किती संपत्ती आहे, याबाबत लोकांना माहिती देऊ नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)