Chanakya Niti : या तीन गोष्टी ज्याला समजल्या त्याचा पराभव करणं अशक्य, जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की जगात अशा तीन गोष्टी आहेत, त्या जर एखाद्या व्यक्तीला जमल्या, तर त्याचा या जगात कोणीही पराभव करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल .

Chanakya Niti : या तीन गोष्टी ज्याला समजल्या त्याचा पराभव करणं अशक्य, जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात?
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 29, 2026 | 9:12 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शत्रूवर विजय कसा मिळवायचा? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात तुमच्या समोर शत्रू कोण आहे? हे आधी लक्षात घ्या, त्यानंतर त्याचा पराभव कसा करता येईल याची योजना तयार करा. त्यासाठी तुम्ही साम, दाम, दंड, भेद यापैकी कोणत्याही नीतीचा वापर करू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शत्रूसोबत लढाई सुरू असताना कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. जर तुम्ही घाई केली तर तुमच्या शत्रूऐवजी तुम्हीच संकटात सापडू शकतात. पुढे चाणक्य यांनी असं देखील म्हटलं आहे की तुम्ही तुमच्या शत्रूच्या पराभवासाठी जी योजना बनवली आहे, जोपर्यंत ती यशस्वी होत नाही तोपर्यंत ती कोणालाही सांगू नका. कारण जेव्हा या योजनेसंदर्भात तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करता तेव्हा ती लीक होण्याचा धोका असतो. ही योजना तुमच्या शत्रूला कळाली तर तो आधीच सावध होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाहीत, त्यामुळे तुमची योजना गुप्त ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. या जगात अशा तीन गोष्ट आहेत, त्या जर तुम्हाला जमल्या तर जगात तुमचा कोणीही पराभव करू शकत नाही, असं देखील चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शत्रूला घाबरू नका – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा कितीही शक्तिशाली असू द्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही घाबरू नका. तुम्ही ज्यावेळी तुमच्या शत्रूला घाबरत नाहीत, तेव्हा तिथेच तुम्ही आर्धी लढाई जिंकलेले असतात. शत्रूला घाबरू नका हे जरी खरं असलं तरी देखील त्याला कमी समजण्याची चूक देखील करू नका, कारण शत्रू हा शत्रूच असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात युद्धाच्या आणि स्पर्धेच्या मैदानात तुम्हाला तुमच्या योजना या नेहमी गुप्त ठेवाव्या लागतात. भविष्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही जर एखादी योजना आखली असेल आणि ती जर तुमच्या शत्रूच्या हाती लागली तर तो या संधीचा पुरेपूर फायदा घेणार. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या योजना नेहमी गुप्त ठेवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

रागावर नियंत्रण – चाणक्य म्हणतात रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय हा नेहमी तुमचं नुकसानच करू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूचा सामना कधीही रागाच्या भरता करू नका. तर डोकं थंड ठेवा त्यानंतर नियोजन करून तुमच्या शत्रूला अलगद जाळ्यात ओढा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us