AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील ही 5 सुंदर शहरे फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत स्वर्ग, कसे पोहोचायचे?

आपल्या भारतात ही पाच ठिकाणं इतकी सुंदर आहेत जी फिरण्यासाठी उत्तम आहेतच, शिवाय फोटोग्राफर्संचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. या ठिकाणांची आणि तिथे कसे पोहोचायचे याची संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊयात.

भारतातील ही 5 सुंदर शहरे फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत स्वर्ग, कसे पोहोचायचे?
Best Places for PhotographersImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 10:10 PM
Share

आपला भारत देश केवळ संस्कृती आणि चविष्ट खाद्यपदार्थांसाठीच नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी खुप प्रसिद्ध आहे. आपल्या भारतात अशी काही शहरं आहेत जेथे संपूर्ण वस्त्या या निळ्या रंगाने रंगवलेले आहेत, तर काही जुन्या फ्रेंच-शैलीतील इमारती आहेत ज्या पाहिल्यावर एखाद्या परदेशी ठिकणी आल्यासारख्या वाटते. यामुळेच प्रवासी आणि फोटोग्राफर्स या रंगीबेरंगी ठिकाणांकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत.

तुम्ही जर एखाद्या शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील ही रंगीबेरंगी गावे आणि शहरे तुमच्यासाठी योग्य ठिकाणे ठरू शकतात. येथील रस्ते, घरे, डोंगराळ भाग आणि संस्कृती प्रत्येक फोटोला खास बनवतात. चला भारतातील अशा पाच सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

1. जोधपूर – भारताचे प्रसिद्ध निळे शहर

राजस्थानमधील जोधपूर हे शहराला भेट देताच तुम्ही संपुर्ण परिसर पाहतच राहाल. कारण तेथील संपुर्ण घरे ही निळ्या रंगाने रंगवलेली आहेत. निळ्या रंगांच्या घरांसाठी हे ठिकाणं जगभर ओळखले जाते. मेहरानगड किल्ल्याच्या आजूबाजूचे रस्ते निळ्या घरांनी भरलेले आहेत. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या या निळ्या भिंती खरोखरच मनमोहक दिसतात.येथील अरुंद गल्ल्या आणि राजस्थानी वास्तुकला फोटोग्राफीसाठी बॅकग्राउंडकरिता एक उत्तम ठिकाणं आहे.

येथे कसे पोहोचावे: जोधपूर शहराचे स्वतःचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन आहे. दिल्ली, जयपूर आणि मुंबई येथून रेल्वे आणि विमानांची सोय सहज उपलब्ध आहे.

2. जयपूर – गुलाबी रंगात रंगलेले शाही शहर

जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. येथील जुन्या इमारती आणि बाजारपेठा गुलाबी रंगाने रंगवलेल्या असल्यामुळे त्याला एक राजेशाही रूप प्राप्त होते. हवा महल, सिटी पॅलेस आणि जुन्या बाजारपेठा खरोखरच मनमोहक आहेत.

या ठिकाणी कसे पोहोचावे: जयपूर रेल्वे आणि विमान प्रवास या मार्गाने जयपूर शहरात जाऊ शकता.

3. पाँडिचेरी – पांढऱ्या आणि पिवळ्या रस्त्यांचे फ्रेंच शहर

पाँडिचेरी येथील फ्रेंच कॉलनी तिच्या सुंदर पांढऱ्या आणि फिकट पिवळ्या रंगाने रंगलेल्या इमारतींसाठी खुप प्रसिद्ध आहे. येथील शांत रस्ते, कॅफे आणि समुद्राकिनारी दिसणारी दृश्ये युरोपीय वातावरण निर्माण करतात. या ठिकाणचे प्रत्येक रस्ते पाहताच क्षणी फोटो काढण्याची इच्छा होते.

येथे कसे पोहोचावे: पाँडिचेरी चेन्नईपासून अंदाजे 3 ते 4 तासांच्या अंतरावर असून, तिथे बस, टॅक्सी आणि ट्रेनने सहज पोहोचता येते.

4. गोकर्ण – निळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या छटा असलेले एक शांत समुद्रकिनारी गाव.

कर्नाटकातील गोकर्ण हे आपल्या शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कॅफे व घरांसाठी प्रसिद्ध होत आहे. येथे गोव्याइतकी गर्दी नसते, त्यामुळे शांतताप्रिय प्रवासी आणि फोटोग्राफीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त पाहणे एक मनमोहक क्षण असतो.

येथे कसे पोहोचावे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गोकर्ण रोड आहे. गोवा आणि बंगळूरहून बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.

5. खोनोमा – हिरवळ आणि पांढरी घरे असलेले एक सुंदर गाव

नागालँडमधील खोनोमा गाव हे ‘ग्रीन व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते. येथील पारंपरिक पांढरी घरे आणि हिरवीगार वनराई या गावाला खरोखरच अद्वितीय बनवते. हे निसर्गप्रेमी आणि सांस्कृतिक शौकिनांसाठी एक स्वर्ग आहे. येथील स्वच्छ रस्ते आणि पर्वतांची दृश्ये फोटोग्राफर्संसाठी एक पर्वणी ठरतात.

येथे कसे पोहोचावे: सर्वात जवळचे शहर कोहिमा आहे, जिथून टॅक्सीने खोनोमा येथे सहज पोहोचता येते.

भारतातील ही रंगीबेरंगी गावे आणि शहरे केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत, तर ती आठवणी आणि सुंदर फोटो काढण्यासाठीचे खजिना देखील आहेत. जर तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासात काहीतरी अद्वितीय आणि नेत्रदीपक शोधत असाल, तर तुमच्या प्रवासाच्या यादीत या ठिकाणांचा नक्की समावेश करा.

Follow Us
डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने
Sanjay Raut | डिलिमिटेशन बाबत ठाकरे गटाचा निर्णय बदलणार? संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका!
ही शांतता स्मशान शांततेकडे नेईल; राज ठाकरेंची केंद्रावर बोचरी टीका! सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट
मोठी खळबळ! 'त्या' कारणावरून महायुतीचा नेता नाराज? बंडखोर नेत्याची थेट एकनाथ शिंदेंकडे धाव...
हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी..
मोठी राजकीय घडामोड! हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात; कोल्हापुरात नवी राजकीय समीकरणं?
फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती?
NCP | राष्ट्रवादीत इनसाईड स्टोरी! फडणवीस-तटकरे भेटीची सुनेत्रा पवारांना कल्पनाच नव्हती? राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात….

Raj Thackrey : सोनम वांगचुकसाठी राज ठाकरे मैदानात, थेट पोस्ट करत म्हणाले, किती दिवस पंतप्रधान आहात…

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?.

BMC ची ताज महाल पॅलेस हॉटेलला 22 कोटींची नोटीस ; काय आहे प्रकरण ?

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने...

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

मोठी खळबळ… सुनेत्रा पवार, पार्थ यांना न सांगताच पटेल, तटकरे यांनी… राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घडलं काय?.

मोठी खळबळ… सुनेत्रा पवार, पार्थ यांना न सांगताच पटेल, तटकरे यांनी… राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घडलं काय?