AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल

Modi Govt : देशात मागच्या दोन-तीन महिन्यात खासदार फोडाफोडी, पक्षावर दावे सांगण्याचे प्रकार बघितले. त्यावेळी नेमकं पुढे काय घडणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला. त्याचं उत्तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मिळू शकतं. कारण भाजप एका मोठ्या मिशनच्या जवळ आहे.

Modi Govt : मोदी सरकार दोन तृतीयांश बहुमताच्या खूप जवळ, शरद पवार आणि अजून एक नेता सोबत आला तर भाजप सगळा गेमच फिरवेल
Modi-Shah
| Updated on: Jul 16, 2026 | 11:06 AM
Share

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी देशाच्या राजकारणात काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. पावसाळी अधिवेशनात एक वेगळं चित्र पहायला मिळू शकतं. लोकसभेत मोदी सरकारचं दोन तृतीयांश बहुमताचं मिशन आणखी मजबूत होऊ शकतं. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची राहिलं. त्यांच्याकडे 8 खासदार आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचं समर्थन करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांचं मतपरिवर्तन झालं, तर तो इंडिया आघाडीसाठी एक धक्का असेल. तृणमुल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि एमके स्टालिन यांच्या पक्षाची सुद्धा भूमिका बदलणार का? हा मुख्य प्रश्न आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी शरद पवारांच्या गटाकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांचं समर्थन करण्याचे संकेत मिळत आहेत.

एप्रिल महिन्यात लोकसभेत हे विधेयक पडलं होतं. मोदी सरकारला दोन-तृतीयांश बहुमत जमवता आलं नव्हतं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सूर बदलले, तर सरकारच्या दोन तृतीयांश बहुमताच्या मिशनला बळकटी मिळेल. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर झाल्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊन असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. एप्रिल महिन्यात हे विधेयक पडल्यानंतर ते पुन्हा मंजूर करण्यासाठी बहुमताची गरज पडेल. ते बहुमत गोळा करण्यासाठी सतत सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. इंडिया आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने या विधेयकाचं समर्थ केलं, तर ती खूप महत्वाची गोष्ट असेल. एप्रिल महिन्यापासून भाजपकडे आधीच 298 खासदारांचं पाठबळ आहे. तृणमुलचे 20 बंडखोर खासदार, उद्धव ठाकरे गटातून आलेले 6 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार, असे मिळून 332 खासदार होतात. द्रमुकचे 22 खासदार सोबत आले तर हा आकडा 354 होईल. अशा स्थितीत दोन तृतीयांश बहुमतापासून मोदी सरकार सहा पावलं दूर असेल.

मोदी सरकारला त्यावेळी बहुमतासाठी किती खासदार हवे होते

उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार फुटल्यानंतर भाजप प्रणीत एनडीए लोकसभेत 360 लक्ष्याच्या जवळ पोहोचली आहे. 360 म्हणजे दोन तृतीयांश बहुमत झालं. तामिळनाडूतील DMK ने मोदी सरकारच्या विधेयकाचं समर्थन केलं, तर हे मिशन इम्पॉसिबल सहज पूर्ण होऊ शकतं. संविधान (131वां संशोधन) विधेयक 2026 लोकसभेत 16 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात आलं. त्यावेळी त्याचा मुख्य उद्देश्य 2011 जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचनेत लोकसभेच्या जागा 543 वरुन वाढवून 850 करणं तसचं नारी शक्ती वंदन अधिनियम अंतर्गत महिलांना 33% आरक्षण लगेच लागू करणं होता. त्यावेळी विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मत पडली. 528 खासदारांच्या लोकसभेत मोदी सरकारला त्यावेळी बहुमतासाठी 352 खासदारांची आवश्यकता होती.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक